रात्रभरात पोलिसांची तात्काळ कारवाई, प्रमुख आरोपींसह संशयित ताब्यात
स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण, पोलिसांच्या वेगवान तपासामुळे समाधान
नाशिक, पांडवलेणी Indira nagar Police Action – शहरातील प्रतिष्ठित ज्ञानपीठ सोसायटीसमोर कबुतरांच्या किरकोळ वादातून मोठा प्रकार उघडकीस आला आहे. रविवारी रात्री सुमारे ११:३० वाजता, रामा बोराडे या २२ वर्षीय युवकाचा धारदार शस्त्राने वार करत निर्घृण खून करण्यात आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
वादाची सुरुवात कबुतरांच्या मालकीवरून (Indira nagar Police Action)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामा बोराडे याने विजय माळेकर याची दोन कबुतरे नेत्रदीप याच्याकडून काढून शौकत शेख यांच्या कबुतरांच्या पेटीवर ठेवली होती. याच कारणावरून रागाने पेटलेल्या शौकत शेख, नफीज सैय्यद, विजय नाळेकर, प्रिन्स पालवे, रोहित पालवे, राहुल कुंभार व इतरांनी मिळून धारदार शस्त्रांनी हल्ला करत रामा बोराडे याचा खून केला.
तक्रार दाखल होताच पोलिसांची झपाट्याने कारवाई (Indira nagar Police Action)
या घटनेनंतर साहिल राजन सिंग यांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट १ ने तात्काळ कारवाई सुरु केली.
पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव व सहायक आयुक्त संदिप मिटके यांच्या विशेष पथकाने गुन्हेगारांचा शोध घेतला. पोहवा विशाल काठे व पोना विशाल देवरे यांना गुप्त बातमीदारांमार्फत माहिती मिळाली की आरोपी समर्थनगर, पाथर्डी फाटा परिसरात लपले आहेत.
आरोपींचा तात्काळ अटक, गुन्ह्याची कबुली (Indira nagar Police Action)
कारवाईदरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने नफीज रफीक सैय्यद (वय २२), शौकत फरीद शेख (वय १८), कार्तिक रंगनाथ भडांगे (वय १८) यांच्यासह एकूण ८१ विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांना इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस अधिकाऱ्यांची टीम आणि विशेष योगदान
या यशस्वी कारवाईत सपोनि हिरामण भोये, पोउनि रविंद्र बागुल, पोहवा प्रशांत मरकट, योगीराज गायकवाड, रविंद्र आढाव, नाझीमखान पठाण, पोना विशाल देवरे, पोअं अमोल कोष्टी, जगेश्वर बोरसे, चालक किरण शिरसाठ आदी अधिकाऱ्यांनी मोलाचे योगदान दिले.
नाशिक पोलिसांची वेगवान कारवाई नागरिकांमध्ये चर्चेचा विषय
या घटनेमुळे शहरात एकाच वेळी भीती आणि पोलिसांवरील विश्वास या दोन्ही भावना दिसून आल्या. काही तासांत आरोपींना पकडून दाखवल्याने नाशिक पोलिसांचे कार्यप्रदर्शन वाखाणण्याजोगे असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.