Nashik-Trimbakeshwar News | महंतांनी मुख्यमंत्र्यांचे वेधले नागरी समस्यांकडे लक्ष

Nashik-Trimbakeshwar News | Mahantani Chief Minister's focus on civic problems

त्र्यंबकेश्वर (नाशिक) : नाशिक येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (दि.1) रोजी घेतलेल्या साधु-महंतांच्या बैठकीत आनंद आखाड्याचे अध्यक्ष महंत शंकरानंद सरस्वती महाराज यांनी त्र्यंबकेश्वरमधील नागरी समस्यांकडे लक्ष वेधले. सिंहस्थ नियोजनात या समस्यांचे कायमस्वरूपी निराकरण करावे, अशी मागणी केली.

सरकारने मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला असल्याने मराठीत बोलत असल्याचे स्पष्ट करुन महंत शंकरानंद महाराज यांनी, उपस्थित हिंदी भाषिक साधु महंतांसाठी हिंदीतूनदेखील मत मांडले. हिंदी राष्ट्रभाषा आहे, मात्र प्रदेशांचे मिळून राष्ट्र होते, असे देखील त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांचा यांचा ‘देवा भाऊ’ असा उल्लेख केला. तर गिरीश महाजन यांचे आम..

की इतर राज्यांनी अनुकरण करावे

त्र्यंबकेश्वर येथे १२ वर्षांनी पाणीपुरवठा योजना राबवली जाते, मात्र गेली २४ वर्षे उन्हाळ्यात दर दोन-तीन दिवसांनीच पाणी मिळते, त्यामुळे पाणीटंचाई गंभीर आहे. सिंहस्थ निमित्ताने कॉरिडॉरच्या कामांबाबत नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीती आहे. त्यांना आश्वासित करणे गरजेचे आहे. समृद्धी महामार्ग त्र्यंबकेश्वरला जोडल्यास भाविकांसाठी प्रवास सुलभ होईल. गोसावी समाजाला समाधी स्थळाची सुविधा दिली जावी. सिंहस्थात शासनाच्या सुविधा मिळण्याची सुरूवात सिंहस्थ १९९१ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी उमेशचंद्र सरंगी यांनी केली. नंतर इतर राज्यांनेही सुविधा देण्यास प्रारंभ केला. याचा विचार करून मुख्यमंत्री फडणवीस यांनी उत्कृष्ट सिंहस्थ केल्यास त्याचे अनुकरण इतर राज्य सरकार करतील, असे मत महंत शंकरानंद यांनी मांडले.चे मैत्रीपूर्ण भांडण असल्याचे सांगितले.