Hemant Godse Nashik | माजी खासदार हेमंत गोडसे झाले होम क्वारंटाइन

Hemant Godse Nashik | माजी खासदार हेमंत गोडसे झाले होम क्वारंटाइन

देवळाली कॅम्प (नाशिक) : नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे यांना कोराेनाची लागण झाल्याने त्यांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती व्यवस्थित असून, डॉक्टर त्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवून आहेत.

गोडसे हे दोन दिवसांपासून मुंबई येथे कामकाजात असताना त्यांना मोठ्या प्रमाणात सर्दीचा त्रास जाणवू लागला. त्यांनी मुंबई येथेच डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचार सुरू केले. या दरम्यान त्यांची कोरोना टेस्ट घेण्यात आली. ती पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी होम क्वारंटाइन होण्याचा सल्ला दिला. दोन दिवसांपासून गोडसे हे आपल्या येथील निवासस्थानी क्वारंटाइन झालेले आहेत. स्थानिक डॉक्टर त्यांच्या प्रकृतीची काळजी घेत आहे. याबाबत गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगून निवासस्थानीच होम क्वारंटाइन झाल्याचे सांगितले.