सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी, संजय राऊतांचा फोनवरुन निर्णय

सुधाकर बडगुजर यांची पक्षातून हकालपट्टी, संजय राऊतांचा फोनवरुन निर्णय

Nashik Shiv Sena UBT PC :शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते (Sudhakar Badgujar) यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे वृत्त आहे. शिवसेना ठाकरे गटाने आज पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यात खासदार ( Sanjay Raut ) यांचा नाशिकचे माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड यांना फोन आला. यावेळी पक्षविरोधी करावाई केल्याने त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.

दोन दिवसापूर्वी खा. ( Sanjay Raut ) नाशिकमध्ये असतांना बजगुजर यांनी मुख्यमंत्री ( Devendra Fadnavis ) यांची भेट घेतली होती. त्यानंतर काल त्यांनी महानगरप्रमुख (Vilas Shinde) यांच्यासह १० ते १२ जण नाराज असल्याचा दावा केला होता. त्यामुळे ठाकरे गटात पुन्हा फुटीचे वारे वाहत असल्याची चर्चा होती. त्यामुळे (UBT Shiv Sena Nashik) ठाकरे गटाने अगोदर ही कारवाई करत मोठा धक्का दिला आहे.
आज शिवसेना ठाकरे गटाचे नाशिक जिल्हाप्रमुख डी. जी. सुर्यवंशी यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत (Sudhakar Badgujar) गैरहजर होते. तर महानगरप्रमुख (Vilas Shinde) यांच्यासह खासदार ( Rajabhau Waje )
उपनेते (Sunil Bagul) , माजी आमदार Vasant Gite , माजी महापौर Vinayak Pandey, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड उपस्थित होते.
पक्ष विरोधी काम केल्या मुळे पक्षप्रमुख ( Uddhav Thackeray) यांच्या आदेशाने (Sudhakar Badgujar) यांची शिवसेना ठाकरे पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

कोण आहेत सुधाकर बडगुजर? (Who is Sudhakar Badgujar)

  • सुधाकर बडगुजर हे नाशिक शिवसेना उबाठा गटाचे महानगर प्रमुख होते.
  • संजय राऊत यांचे निकटवर्तीय म्हणून सुधाकर बडगुजर ओळखले जात
  • वर्ष 2007 पासून सुधाकर बडगुजर यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली.
  • 2007 मध्ये ते नाशिक महापालिकेत अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आले.
  • त्यावेळी शिवसेनेचे नगरसेवक तथा माजी महानगरप्रमुख विनायक पांडे हे अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्यावर महापौरपदी विराजमान झाले होते.
  • तेव्हाच्या अपक्षांच्या गटात सुधाकर बडगुजर यांचा समावेश होता.
  • यातूनच बडगुजर शिवसेनेच्या संपर्कात आले. 14 जून 2008 रोजी एका जलकुंभाच्या भूमिपूजन कार्यक्रमात बडगुजर यांचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेते संजय राऊत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश झाला.
  • अभ्यासू आणि आक्रमक शैलीमुळे बडगुजर यांच्याकडे पक्षाने 2009 ते 2012 अशी तीन वर्षे नाशिक महापालिकेचे सभागृहनेतेपद सोपविले.
  • पुढे नाशिक महापालिकेची सत्ता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे गेल्यानंतर 2012 ते 2015 अशी तीन वर्षे बडगुजर यांनी विरोधी पक्षनेतेपद भूषविले.
  • 2014 मध्ये त्यांना पक्षाने नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी दिली यात त्यांचा पराभव झाला.
  • गेल्या 15 वर्षापासून ते नाशिक महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावर ते कार्यरत होते.
  • विधानसभा निवडणुकीसाठी नाशिक पश्चिम मतदारसंघातून महाविकास आघडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्याच्याकडे बघितलं होतं