नामको रुग्णालयात लाच प्रकरण : महिला डॉक्टरसह तिघांवर गुन्हा

नामको रुग्णालयात लाच प्रकरण : महिला डॉक्टरसह तिघांवर गुन्हा

नाशिक | भ्रष्टाचार प्रकरण
महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार घेतलेल्या रुग्णाच्या कुटुंबीयांकडून ३० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी नामको कॅन्सर हॉस्पिटलच्या महिला वैद्यकीय अधीक्षक डॉ. विशाखा जहागिरदार, रोखपाल आणि एका महिला कर्मचाऱ्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


लाच घेतल्याचा आरोप

  • तक्रारदार हे पिवळे शिधापत्रिका धारक
  • पत्नीवर महात्मा फुले योजनेत मोफत शस्त्रक्रिया
  • हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यासाठी मागणी: ३०,००० रु.
  • त्यापैकी २०,००० रु. स्वीकारले, म्हणत ACB ने केली कारवाई

ACB ची सापळा कारवाई

  • दिनांक ७ मे : ACB ने मागणी पडताळणी केली
  • संशयितांनी २१ हजारांची लाच पुन्हा मागितली
  • ११ हजार घेतले; महिला कर्मचारी गायत्री सोमवंशी घटनास्थळी

भ्रमणध्वनी ताब्यात नाहीत!

  • डॉ. जहागिरदार व रोखपाल यांचे मोबाईल अद्याप ताब्यात नाहीत
  • गुन्हा पंचवटी पोलिस ठाण्यात नोंद

कारवाईचं नेतृत्व

  • अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली
  • सापळा अधिकारी: DySP स्वाती पवार
  • पथकात: हेंबाडे, खांडवी, अहिरराव, जाधव

योजना मोफत तरी लाच का?

महात्मा फुले योजनेच्या नावाखाली खासगी रुग्णालयांकडून उकळपट्टी होण्याच्या तक्रारी सातत्याने येत असताना, नामकोसारख्या हॉस्पिटलमध्येही भ्रष्टाचार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे.