Aadhaar Update News | 10 वर्ष जुने आधार कार्ड अपडेट न केल्यास रद्द होण्याची शक्यता, UIDAI ची अंतिम मुदत वाढवली

Aadhaar Update News | 10 year old Aadhaar card may be cancelled if not updated, UIDAI extends deadline

Aadhaar Update News – Aadhaar Card Update 2025 | UIDAI Latest News | Free Aadhaar Update Deadline Extended | Aadhaar Cancel Warning

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

सरकारचा मोठा निर्णय: 10 वर्षांहून जुने आणि अद्यतनित न केलेले आधार कार्ड होणार रद्द

नवी दिल्लीभारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) ने आधार कार्ड धारकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. ज्या नागरिकांनी गेल्या १० वर्षांपासून आधार कार्ड अपडेट केलेले नाही, त्यांनी तत्काळ अपडेट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा असा आधार कार्ड रद्द होण्याची शक्यता UIDAI ने स्पष्ट केली आहे.

आधार अपडेटसाठी अंतिम मुदत वाढली – 14 जून 2026 पर्यंत संधी

याआधी आधार अपडेटची अंतिम तारीख 14 जून 2025 होती, परंतु आता ती 14 जून 2026 पर्यंत वाढवण्यात आली आहे. UIDAI ने त्यांच्या अधिकृत ‘X’ (Twitter) अकाउंटवरून यासंदर्भात घोषणा केली आहे.

ही सेवा UIDAI च्या पोर्टलवर पूर्णपणे मोफत उपलब्ध आहे.

आधार रद्द होण्याची शक्यता कुणाला?

जर तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपूर्वीचं आहे आणि एकदाही अपडेट केलं नसेल, तर ते अपडेट करणं आता अनिवार्य आहे.

अद्ययावत न केल्यास:

  • आधार क्रमांक बंद होऊ शकतो
  • विविध सरकारी सेवांचा लाभ मिळणार नाही
  • बँकिंग, सबसिडी, KYC सेवा अडचणीत येऊ शकतात

Aadhaar Update साठी आवश्यक कागदपत्रे:

  • ओळखीचा पुरावा (Proof of Identity): पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट
  • पत्त्याचा पुरावा (Proof of Address): मतदार ओळखपत्र, विजेचा बिल, टेलिफोन बिल

घरबसल्या ऑनलाइन आधार अपडेट करण्याची प्रक्रिया:

  1. UIDAI अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या
  2. ‘Update Aadhaar’ पर्यायावर क्लिक करा
  3. आधार क्रमांक टाका आणि नोंदणीकृत मोबाईलवरील OTP वापरून लॉगिन करा
  4. ‘Document Update’ वर क्लिक करा
  5. ओळख आणि पत्त्याचे स्कॅन कागदपत्र अपलोड करा
  6. माहिती तपासून ‘Submit’ करा
  7. मिळालेल्या Request ID चा वापर करून अपडेटची स्थिती तपासा