नाशिक Heavy Rain Nashik – मान्सूनपूर्व पावसाने नाशिक जिल्ह्यात धुमाकूळ घातला आहे. ठिकठिकाणी वीज पडण्याच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण केलं आहे. त्र्यंबकेश्वर येथे वीज पडून एका २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाला असून, येवला येथे वीज पडून मायलेकी जखमी झाल्या आहेत. हवामान विभागाने पुढील ४८ तासांसाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.
त्र्यंबकमध्ये वीज पडून युवक ठार Heavy Rain Nashik
त्र्यंबक तालुक्यातील ओहळ गावात जगदीश सिताराम लहारे (वय २५) या तरुणावर वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. ही घटना गावात शोककळा पसरवून गेली.
येवला तालुक्यात मायलेकी जखमी
येवला तालुक्यातील पिंपरी येथे जोरदार वाऱ्यासह पावसाने घराची भिंत कोसळली. यात दोन महिला – मायलेकी जखमी झाल्या. त्यांच्यावर तातडीने वैद्यकीय उपचार करण्यात आले.
पशुधनाचीही मोठी हानी
- नांदगाव तालुक्यातील परधाडी येथे वीज पडून अरुण नानासाहेब पवार यांचा बैल मृत झाला.
- कुसुमतेल येथे शेतात वीज पडून गाय ठार झाली.
- सिन्नर तालुक्यातही वीज पडून एक बैल मृत्युमुखी पडला.