नाशिक : आषाढ शुद्ध सप्तमीपासून २ जुलै ते ११ जुलै या कालावधीत पंढरपूर येथे आषाढी वारी यात्रा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये ६ जुलै रोजी मुख्य दिवस – आषाढी एकादशी साजरी होणार आहे. तसेच गुरुपौर्णिमा १० जुलै रोजी आहे. या काळात पंढरपूरला जाणाऱ्या आणि येणाऱ्या वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने एसटी प्रशासनाने विशेष नियोजन केले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक विभागामार्फत पंढरपूर यात्रेसाठी एकूण ३०० अतिरिक्त एसटी बसेस सोडण्यात येणार आहेत. या बसेस २ जुलै ते ११ जुलै दरम्यान विविध बसस्थानकांवरून थेट पंढरपूरकडे प्रवास करतील. एसटी महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, खालील प्रमुख बसस्थानकांवरून ही अतिरिक्त वाहतूक उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रमुख बस स्थानकांवरून थेट पंढरपूर सेवा:

या बसस्थानकांवरून भाविकांसाठी थेट बस सुविधा उपलब्ध असून, पुरेशा बस संख्येची व्यवस्था करण्यात आली आहे. यात्रेदरम्यान भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर प्रवास मिळावा यासाठी हे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.
भाविकांना विनंती:
यात्रेदरम्यान गर्दीचे प्रमाण जास्त असल्यामुळे बस वेळापत्रकासाठी जवळच्या बसस्थानकात संपर्क साधावा व आगाऊ तिकीट आरक्षण करून सहकार्य करावे.