राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची एकत्र उपस्थिती; संजय राऊत यांची मोठी घोषणा
मुंबई :Political News महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीविरोधात येत्या ५ जुलै रोजी मुंबईत मोठा जनमोर्चा निघणार आहे. विशेष म्हणजे, या मोर्चामध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सामाजिक माध्यमावर घोषणा (Political News)
संजय राऊत यांनी सोशल मीडियावर राज आणि उद्धव ठाकरे यांचा एकत्र फोटो शेअर करत म्हटले की,
“महाराष्ट्रातील शाळांमध्ये हिंदी सक्तीविरोधात एकत्र आणि एकच मोर्चा निघेल!”
यानंतर त्यांनी इंग्रजीत देखील ट्विट करत लिहिले –
“There will be a single and united march against compulsory Hindi in Maharashtra schools. Thackeray is the brand!”
पत्रकार परिषदेत खुलासा
या पोस्टनंतर आज आयोजित पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी या मोर्चाची माहिती अधिकृतरित्या दिली. त्यांनी काल झालेल्या राजकीय चर्चेबाबत माहिती देताना सांगितले की, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर येत आहेत, हे महाराष्ट्राच्या भाषिक अस्मितेसाठी ऐतिहासिक ठरणार आहे.
मोर्चा का आहे महत्त्वाचा?
- राज्यातील शाळांमध्ये हिंदी सक्तीचा निषेध
- मराठी भाषेच्या आणि मातृभाषेच्या संवर्धनासाठी आवाज
- प्रादेशिक अस्मिता आणि शिक्षणस्वातंत्र्याचा मुद्दा
या मोर्चाच्या निमित्ताने अनेक वर्षांनी ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर येणार असल्याने महाराष्ट्राच्या राजकारणातही एक वेगळीच चर्चा रंगली आहे. हिंदी सक्तीविरोधातील जनआंदोलनास आता अधिक बळ मिळणार आहे, हे निश्चित.