नाशिक (जुलै 1, 2025): Nashik Crime News
जुने नाशिक परिसरातील नानावली येथे अवघ्या 10 रुपयांच्या वर्गणीवरून निर्माण झालेल्या वादातून अल्पवयीन युवकावर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना सोमवारी (30 जून) रात्री घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भद्रकाली पोलिसांनी गुन्हा दाखल करून चौघा संशयितांचा शोध सुरु केला आहे.
पीडित युवकाचे नाव रजा फिरोज शेख (वय 17, रा. नानावली, जुने नाशिक) असे असून, त्याच्यावर कोयत्याने गळ्यावर जबरदस्त वार करण्यात आला. या हल्ल्यामुळे तो जागेवर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. उपस्थित नागरिकांनी त्याला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्यामुळे नातेवाईकांनी त्याला खासगी रुग्णालयात हलवले.
हल्ला करणारे संशयित आरोपी: (Nashik Crime News)
- अल्ताफ शहा
- नजिम शहा
- फिरोज शहा
- अयान शहा
या चारही आरोपींविरुद्ध भद्रकाली पोलीस ठाण्यात कलम 307 (खुनाचा प्रयत्न), 34 इत्यादी कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपी सध्या फरार असून पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.