शनिवार, 26 ऑक्टोबर 2024. अश्विन कृष्ण दशमी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राहू काळ – सकाळी 9 ते 10:30
आज दुपारी 4 वा पर्यंत चांगला दिवस.
26 ऑक्टोबर रोजी जन्मलेल्यांमध्ये वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
तुमच्यावर शनी आणि शुक्र या ग्रहांचा प्रभाव आहे त्यामुळे जीवनात बऱ्याच वेळा कोणत्याही गोष्टी वेळच्यावेळी होत नाहीत.चंद्राचा ही प्रभाव असल्याने चंचलता, अस्वस्थता ही असते.नीटनेटके पणा, सौदर्य प्रसाधने,गृहसजावट याची आवड असते.प्रवासाची आवड आणि मैत्रिणींचा सहवास आवडतो.विरुद्धलिंगी व्यक्ती बाबतीत आक्रमक पवित्रा घेता.पैशाच्या बाबतीत नशिबवान असून सहजपणे पैसा मिळतो.प्रेमात समस्या होतात. घराबद्दल आणि प्रियजनांबद्दल ओढ असते.मोठया व म्हत्वाकांक्षी योजना पार पाडण्यात आनंद वाटतो.तुमच्याकडे उस्फुर्त पणा, उत्साह,जिवंतपणा असतो.
शिस्त, गांभीर्य, दृढपणा तसेच कर्तव्याची जाणीव तुमच्यात प्रामुख्याने आढळून येते. तुम्ही सखोल विचारांचे आणि स्थिर वृत्तीचे आहात. तुम्ही समतोल विचार करतात आणि कोणत्याही प्रश्नाची दुसरी बाजू समजून घेतात तरी देखील तुमच्याबद्दल इतरांचे गैरसमज होतात. निसर्ग, सौंदर्य, संगीत, फुलं यांची तुम्हाला आवड असते. चार चौघांपेक्षा तुम्ही अधिक धोरणी आणि बुद्धिमान आहात. तुम्ही महत्त्वाकांक्षी असून कार्य मग्न असतात. तुम्ही कार्यक्षम आणि अधिकार गाजवणारे आहात. तुम्हाला तुमच्यापेक्षा दुर्बल लोकांबद्दल आपुलकी आणि आदर असतो. तुमचे व्यक्तिमत्व प्रसन्न असल्यामुळे तुम्हाला भेटून इतरांना आनंद होतो. तुम्ही एक उत्तम व्यवस्थापक असतात. व्यवहारातील सर्व गोष्टी तुम्ही सुलभतेने हाताळू शकतात. आर्थिक बाबतीत तुमचे नियोजन उत्तम असते. इतरांच्या समस्या आणि दुःख तुम्ही चांगल्या प्रकारे सोडवू शकतात. तुम्ही इतरांसाठी एक आदर्श असतात. तुम्ही कर्तबगार असून वागण्यात पद्धतशीरपणा असतो .खास करून कोणत्याही रूढीला बांधून घेणे तुम्हाला पसंत नसते. समाजप्रियतेमुळे घरी येणाऱ्या जाणाऱ्यांची संख्या बरीच असते.
शुभ दिवस:- बुधवार, गुरुवार, शुक्रवार.
शुभ रंग:- राखाडी, काळा, जांभळा, गडद निळा.
शुभ रत्न:- इंद्रनील, काळा मोती, हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:- आज घरातल्या इंटेरिअर साठी खर्च होतील.आरोग्य सुधारेल.
वृषभ:- आज चांगला दिवस असून मनाजोगती कामे होतील. सरकारी कामे मात्र रेंगाळतील.
मिथुन:- आज नोकरी/व्यवसायात उन्नती होईल.मान मिळेल.कौटुंबिक सौख्य लाभेल.
कर्क:- आज सकारात्मक विचार कराल. नेतृत्व गुण उठून दिसतील. मात्र अनपेक्षित खर्च होतील.
सिंह:- आज कामाचे नियोजन बदलेल.आरोग्यासाठी खर्च होईल.
कन्या:- आज जुनी येणी वसूल होतील.चोरी चे भय ,चीजवस्तू सांभाळा. मेहनत जास्त करावी लागेल.
तुळ:- आज
आर्थिक दृष्टीने चांगला दिवस.कामे मनाप्रमाणे होतील.कायदे पाळा.
वृश्चिक:- आज धाडसी स्वभाव उफाळून येईल.सहलीचे योग. विद्यार्थ्यांना यश.
धनु:- आज शेजाऱ्यांशी संवाद साधा,नमते घ्या.सरकारी कामे काटेकोरपणे करा.
मकर:- आज आर्थिक आवक चांगली राहील.स्वाभिमान जपा.नवीन संधी चालून येतील.कामे पार पडतील.
कुंभ:- आज कनिष्ठां कडून मान मिळेल.संपत्ति वाढेल.
धनलाभाची शक्यता.
मीन:-आज वाहन चालवताना काळजी घ्या.आरोग्य जपा. महत्वाकांक्षा जागृत होईल.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.