नाशिक Nashik Goda Aarti | Nashik Flood and Godavari Aarti Update 2025
नाशिकची धार्मिक आणि सांस्कृतिक ओळख ठरलेली गोदावरी महाआरती यंदाही आषाढी एकादशीच्या दिवशी (दि. ६ जुलै) मुसळधार पाऊस आणि पुराच्या पार्श्वभूमीवरही भक्तिभावाने पार पडली.
रामतीर्थ गोदावरी सेवा समितीच्या वतीने दररोज केली जाणारी ही आरती पुराच्या पाण्यात उभं राहूनही अखंड सुरू ठेवण्यात आली. पुराच्या प्रवाहात उभे राहून ११ सेवकांनी – ६ महिला आणि ५ पुरुष – पावसात भिजत गंगामातेस पूजन आणि महाआरती पार पाडली.
भक्तीचा पूर: मुसळधार पावसातही महाआरतीला भाविकांची उपस्थिती
- भक्तांनी रेनकोट, छत्र्यांसह आरतीसाठी उपस्थिती लावली.
- देवीस खण-नारळाने ओटी भरून महापूजा करण्यात आली.
- भाविकांमध्ये समाधानाची भावना, नित्यपूजेची परंपरा पुढील पिढीकडे सोपवण्याचा संकल्प अधोरेखित.
गोदावरी नदीला पहिला पूर – रामकुंड परिसरात पाण्याचा वेढा (Nashik Goda Aarti)
- गंगापूर धरणातून ५,१५४ क्यूसेक विसर्ग वाढल्याने नदीचा प्रवाह वाढला.
- होळकर पुलाखालून १०,००० क्यूसेकहून अधिक प्रवाह
- दुतोंड्या मारुती मंदिर, अर्धनारीनटेश्वर मंदिर पाण्याखाली
- रामकुंड परिसरात दशक्रिया विधी व भोजन सेवा सुरूच
पुरबघ्यांची गर्दी आणि वाहतूककोंडी
- आषाढी एकादशी व रविवारच्या सुट्टीमुळे रामकुंड परिसरात भाविकांची प्रचंड गर्दी
- सेल्फी घेण्यासाठी साईबाबा मंदिर परिसरात झुंबड
- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुलावर संध्याकाळी वाहतूक ठप्प
- पोलीस प्रशासनाकडून सतत गर्दी हटवण्याचे प्रयत्न
पुरामुळे बाजारपेठांमध्ये गोंधळ – दुकानांत पाणी
- भाजी पटांगणातील टपर्या हलवून भांडीबाजारात हलवण्यात आल्या
- काळे स्टील भांडार परिसरात टपर्यांची गर्दी
- काही दुकानांत पुराचे पाणी शिरले, व्यापार्यांनी दिवसभर सामान हलवले
- पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अलर्ट, नागरिकांनी सतर्क राहावे – जिल्हा प्रशासन