HomeExpo2025 – CREDAI Nashik Metro Property Expo 2025 | ‘नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ’ : नाशिकमध्ये घर घेण्याची सुवर्णसंधी!

HomeExpo2025 - CREDAI Nashik Metro Property Expo 2025 | ‘Namah Nashik – Mahakumbh of Property’: Golden opportunity to buy a house in Nashik!

Nashik Real Estate News | Property Expo in Nashik | CREDAI Nashik Metro

नाशिक HomeExpo2025: नाशिककरांचे ‘स्वतःचे घर’ असावे, हे स्वप्न आता पूर्ण होणार आहे!
CREDAI Nashik Metro तर्फे आयोजित केलेल्या ‘नम: नाशिक – प्रॉपर्टीचा महाकुंभ’ या भव्य प्रॉपर्टी एक्स्पोचे उद्घाटन नुकतेच ठक्कर डोम, नाशिक येथे पार पडले.
हा प्रॉपर्टी महोत्सव १४ ते १८ ऑगस्ट २०२५ दरम्यान होणार असून, एकाच छताखाली ५०० हून अधिक प्रॉपर्टी प्रकल्प उपलब्ध असणार आहेत.

प्रदर्शनाच्या मुख्य वैशिष्ट्या :

  • नाशिक शहरातील ८० हून अधिक नामांकित बिल्डर्सचे सहभाग
  • फ्लॅट्स, प्लॉट्स, दुकाने, ऑफिसेस यांचे शेकडो पर्याय
  • नामांकित गृहकर्ज संस्था प्रदर्शनात सहभागी
  • ‘हरित नाशिक’ संकल्पना व मार्गदर्शनात्मक सेमिनार्स
  • प्रत्येक दिवशी लकी ड्रॉ – नाशिककरांसाठी खास आकर्षण!

क्रेडाई नाशिक मेट्रो अध्यक्ष गौरव ठक्कर यांचे मत :

“नाशिकमधील प्रत्येक कुटुंबाचे आपले घर असावे, या उद्देशाने हा प्रॉपर्टी एक्स्पो आयोजित केला आहे. येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यानिमित्त नाशिकची कनेक्टिव्हिटी व पायाभूत सुविधा अधिक बळकट होणार आहेत, जे रिअल इस्टेट गुंतवणुकीसाठी मोठा संधीचा काळ आहे.”

नाशिक रिअल इस्टेट गुंतवणुकीचे फायदे :

  • प्रगत शहरे व औद्योगिक क्षेत्रांशी उत्तम संपर्क (रेल्वे, रस्ते, विमान)
  • उत्तम हवामान, मुबलक पाणी, वाढते शैक्षणिक व वैद्यकीय नेटवर्क
  • सिंहस्थ २०२७ पूर्वी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या विकास योजना
  • कृषिपूरक आणि औद्योगिक गुंतवणुकीस चालना

‘हरित नाशिक’चे विशेष आकर्षण : (HomeExpo2025)

प्रदर्शनस्थळी ‘हरित नाशिक’ ही संकल्पना प्रस्थापित करण्यासाठी चार दिवस मान्यवरांचे सेमिनार,
CREDAI गॅलरीमध्ये तीन दशकांच्या नाशिकमधील बांधकाम प्रवासाचे फोटो प्रदर्शन,
व लकी ड्रॉद्वारे नाशिककरांना आकर्षक बक्षिसांची संधी मिळणार आहे.

प्रॉपर्टी एक्स्पो स्थळ व वेळ :

  • स्थळ: ठक्कर डोम, नाशिक
  • तारीख: १४ ते १८ ऑगस्ट २०२५
  • वेळ: सकाळी १० ते सायंकाळी ८