पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्रासाठी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

wande bharat train

मुंबई, 18 सप्टेंबर 2024 – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महाराष्ट्राच्या प्रवाशांसाठी मोठी भेट दिली आहे. त्यांनी तीन नवीन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांना हिरवा झेंडा दाखवून महाराष्ट्रातील प्रवाशांसाठी गतिमान प्रवासाची सुविधा उपलब्ध करून दिली. या तीन नवीन गाड्यांमध्ये पुणे ते कोल्हापूर, पुणे ते हुबळी आणि नागपूर ते सिकंदराबाद या मार्गांवरील वंदे भारत एक्सप्रेसचा समावेश आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आधीच महाराष्ट्रात वंदे भारत एक्सप्रेसची लोकप्रियता मोठी असून, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शिर्डी, सोलापूर, मडगाव, जालना-नागपूर, बिलासपूर, इंदोर, गांधीनगर आणि अहमदाबाद या मार्गांवर आठ वंदे भारत गाड्या धावत आहेत. आजपासून सुरू झालेल्या नवीन गाड्यांमुळे महाराष्ट्रातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर आणि जलद प्रवासाचा लाभ होणार आहे.

या निर्णयामुळे महाराष्ट्रातील प्रवाशांची दीर्घकाळापासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे. वंदे भारत एक्सप्रेसच्या जलद गती, आरामदायी सुविधा आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या गाड्यांनी लोकांच्या प्रवासाला नवीन दिशा दिली आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे राज्यातील परिवहन व्यवस्थेला मोठी चालना मिळाली आहे.

Leave a Reply