नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिलांचा मानवी साखळी कार्यक्रम यशस्वी

Nashik madhye rashtrawadi congresschya mahilancha manavi sakhali karyakram yashasvi

नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यात मानवी साखळी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी कल्याणकारी योजनांच्या समर्थनार्थ सहभाग घेतला. मुंबईनाका ते द्वारका या मुख्य रस्त्यावर गुलाबी थीमने सजलेल्या महिलांनी मानवी साखळी तयार केली. हातात विविध योजनांचे फलक घेऊन “राष्ट्रवादी दादाचा वादा लाभ आणि बळ,” “राष्ट्रवादीचा वादा-धन्यवाद दादा” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या सर्जनशीलतेने व आधुनिक कल्पनांसह जनसंपर्कासाठी मैदानात उतरल्या आहेत. गेल्या दोन दिवसांत तालुकावार स्वाक्षरी मोहीम, राष्ट्रवादी हेल्पलाईन आणि मानवी साखळी अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांनी “दादाचा वादा, काम करत आलो काम करत राहू” हे गीतही सादर केले.

कार्यक्रमात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, शहराध्यक्ष योगिता आहेर, सायरा शेख, योगिता पाटील, अपर्णा देशमुख, सुरेखा नागरे, राजश्री पहिलवान, सीमा राजोळे, संगिता राऊत आणि पुष्पलता उदावंत यांसह तालुक्याचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

याचबरोबर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे गेल्या दोन दिवसांत तालुकावार स्वाक्षरी मोहिम राबवण्यात आली. यामध्ये हजारो नागरिकांनी पांढऱ्या कॅनव्हासवर “माझी लाडकी बहिन योजनेला माझा पाठिंबा आहे आणि ती पुढील पाच वर्षे सुरू राहावी” अशी इच्छा व्यक्त करीत स्वाक्षरी केली.

कार्यक्रमात शितल भोर, भारती खिरारी, सरला गायकवाड, अपर्णा खोत, कल्पना बर्वे, अपेक्षा अहिरे, नलिनी वंजे, रुपाली पठाडे, वृषाली बच्छाव, रोहिणी रोकडे आणि मंगल मोकळ यांसारख्या असंख्य महिला उपस्थित होत्या.

Leave a Reply