उपजीविकेचे आवश्यक शिक्षण सर्वांनी जरूर घ्यावे, पोटा पाण्यचा उद्योग जिकिरीने करावा पण एवढय़ावरच न थांबता साहित्य, चित्र, नाट्य, संगीत आणि खेळ यातल्या एखाद्या तरी कलेशी मैत्री करावी. पोटा पाण्याचे उद्योग तुम्हाला जगावतील पण कलेशी जमलेली मैत्री ही तुम्हाला का जगायचं हे सांगून जाईल अस जेष्ठ साहित्यिक पू. ल. देशपांडे म्हणतात आणि ते अगदी खर आहे.. खरच छंद माणसाला जगायला शिकवतात..
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
संगीत कलेसाठी आपल आयुष्य वाहून घेतलेले सुप्रसिद्ध संगीतकार गायक नाशिक येथील सरगम म्युझिक अकॅडमीचे संचालक नंदकुमार देशपांडे यांचा ५१ वा वाढदिवस आणि सरगम म्युझिक चे रौप्यमोहोत्सवी वर्ष हा दुग्धशर्करा योग २२ सप्टेंबर ला जुळून आला. या सुवर्णमोहोत्सवानिमित सरगम च्या ५१ विद्यार्थ्यांनी सदाबहार ५१ या मैफिलितून गुरुवर्य नंदकुमार देशपांडे सरांना मानवंदना दिली. सरगम म्युझिक अकॅडमी तर्फे 22 सप्टेंबर २४ ला संध्याकाळी प. सां. नाट्यगृह सभागृहात हा दिमाखदार सोहळा अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात सम्पन्न झाला. यावेळी प्रथम कार्यक्रमाची सुरुवात नंदकुमार देशपांडे सर त्यांचा परिवार, कपिल कुलम सिद्धपीठमच्या कृष्णामाई आणि प्रमोद दीक्षित यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सानिका जैन यांच्या सूर निरागस हो या गणेशवंदने न कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. त्या नंतर सरांना अभिवादन पर गाण्यांच्या कार्यक्रमाला सुरवात झाली.
या सुवर्ण महोत्सवी अभिष्टचिन्तन सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक निर्माता गोदापूत्र चिन्मय उदगीरकर उपस्थित होते. त्यांनी देशपांडे सरांच्या वाढदिवसाच्या सदिच्छा देऊन संगीतातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि त्यांचे भरभरून कौतुक केले. अनेक नवोदित गायक घडवून नाशिकच्या सांस्कृतिक परंपरेत मोलाची भर घालत आहेत असा आवर्जून उल्लेख केला. या वेळेस कृष्णामाई यांनी देशपांडे सरांच औक्षण केल आणि विद्यार्थ्यांनी आणलेला खास संवादिनीच्या आकाराचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला..
त्यानंतर एकाहून एक सरस अशा भक्तीगीतांपासून ते लावणी पोवाडा, लोकगीत, गवळण, हिंदी मराठी भाव गीते या गाण्यांच्या मेजवानीने रसिक श्रोते अगदी आनंदित झाले आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सोहळ्याच्या शेवटी कार्यक्रमाची सांगता देशपांडे सरांच्या पोवाडा आणि भैरवी ने वातावरण अगदी भारावून गेल होतं. कार्यक्रमाच प्रास्ताविक प्राजक्ता गायधनी यांनी केले. तर या रौप्य महोत्सव कार्यक्रमाचे निवेदन अतिशय सुंदररित्या ओघवत्या शैलीत मनाली मनोज गर्गे आणि संतोष कराळे यांनी केल. कार्यक्रमाचे उत्तम संगीत संयोजन अमोल पाळेकर त्यांचा वाद्यवृद यांनी केल. त्याच बरोबर कार्यक्रम यशस्वीततेसाठी स्वराली देशपांडे, अमित गुरव, सुगंधा शुक्ल, वैशाली शुक्ल, धनंजय भावसार, चारुलता विसपुते आणि डॉ.वृषिनीत सौदागर यांचे सहकार्य लाभले.
सर्व विद्यार्थ्यांनी मिळून आयोजित केलेला हा नंदकुमार देशपांडे सरांचा सुवर्ण महोत्सवी सोहळा अगदी डोळ्यांच पारणे फेडणारा ठरला.
