अनंत अंबानींकडून लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकूट, किंमत तब्बल १६ कोटी!

lalbag raja28 2024091297779

मुंबईतील प्रसिद्ध लालबागच्या राजाला यंदा एक विशेष भेट मिळाली आहे. उद्योगपती अनंत अंबानी यांनी आपल्या कुटुंबीयांच्या वतीने लालबागच्या राजाला २० किलो सोन्याचा मुकूट अर्पण केला आहे, ज्याची एकूण किंमत तब्बल १६ कोटी रुपये आहे. या अनोख्या भेटीची सध्या जोरदार चर्चा होत असून, भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

लालबागच्या राजाला नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखले जाते आणि यंदा मंडळाच्या स्थापनेचे ९१ वे वर्ष आहे. यावर्षी गणेशोत्सवात “मयूर महल” या थीमवर बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे. १४ फूट उंचीची बाप्पाची मूर्ती मयूरासनावर विराजमान असून, या मूर्तीवर अंबानींनी अर्पण केलेला सोन्याचा मुकूट शोभत आहे.

विशेष म्हणजे, यावर्षी अनंत अंबानी यांची लालबाग गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकारणीमध्ये कार्यकारी सल्लागार म्हणून नियुक्ती झाली आहे. त्यानंतर त्यांनी या मोठ्या भेटीची घोषणा केली. अंबानी कुटुंबीय गेल्या १५ वर्षांपासून लालबागच्या राजाशी विविध उपक्रमांच्या माध्यमातून जोडले गेले आहेत. रिलायन्स फाऊंडेशनच्या माध्यमातून आरोग्यविषयक उपक्रमांमध्येही मंडळाला मदत करण्यात आली आहे.

लालबाग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी या भेटीची माहिती दिली असून, अंबानी कुटुंबीयांच्या या योगदानामुळे मंडळाची प्रतिष्ठा अधिकच वाढली आहे.

Leave a Reply