प्रयागराज – भारतातील सुप्रसिद्ध उद्योगपती गौतम अदाणी Adani यांचे छोटे चिरंजीव जीत अदाणी Adani यांचा विवाह ७ फेब्रुवारी २०२५ रोजी दिवा जैमीन शाह यांच्यासोबत होणार आहे. महाकुंभ मेळा २०२५ निमित्त प्रयागराजला आलेल्या गौतम अदाणी यांनी माध्यमांशी संवाद साधताना याबाबत माहिती दिली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
पारंपरिक साधेपणाचा स्वीकार:
गेल्या काही वर्षांपासून भव्यदिव्य विवाहसोहळ्यांमुळे चर्चेत असलेल्या उद्योगपती कुटुंबांप्रमाणे अदाणींच्या घरातील हा विवाहदेखील लक्षवेधी ठरणार का, याबाबत उत्सुकता होती. मात्र, गौतम अदाणी Adani यांनी या विवाहसोहळ्याचा थाट साधा व पारंपरिक असणार असल्याचे स्पष्ट केले आहे. “जीतचं लग्न हे कौटुंबिक आणि पारंपरिक पद्धतीने होणार आहे. आमचं कामकाज असो किंवा जीवनशैली, ती नेहमीच सामान्य राहिली आहे,” असे अदाणी यांनी सांगितले.
जीत आणि दिवाचा प्रवास:
जीत अदाणी Adani यांनी युनिव्हर्सिटी ऑफ पेनसिल्व्हेनिया स्कूल ऑफ इंजिनीअरिंग अँड अप्लाइड सायन्सेसमधून शिक्षण घेतले असून २०१९ मध्ये अदाणी ग्रुपमध्ये काम सुरू केले. सध्या ते ग्रुप फायनान्सचे उपाध्यक्ष आहेत. दुसरीकडे, दिवा शाह एका प्रतिष्ठित व्यावसायिक कुटुंबातून असून ती तिच्या साधेपणा व कर्तृत्वासाठी ओळखली जाते.
१२ मार्च २०२३ चा साखरपुडा:
जीत आणि दिवाचा साखरपुडा १२ मार्च २०२३ रोजी छोटेखानी सोहळ्यात पार पडला होता. या सोहळ्याला मोजक्या व्यक्तींनी उपस्थिती दर्शवली होती.
अंबानींपाठोपाठ अदाणींचाही Adani चर्चेत विवाह:
२०२४ मध्ये अनंत अंबानींच्या लग्न सोहळ्याची भव्यता जगभरात चर्चेचा विषय ठरली होती. आता २०२५ मध्ये अदाणींच्या घरातील हा विवाह भारतात पुन्हा एकदा सेलिब्रिटी व उद्योगपतींना एकत्र आणणारा ठरेल का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
गौतम अदाणींच्या विधानानुसार, हा विवाहसोहळा सेलिब्रिटींचा महाकुंभ ठरणार नसून कुटुंबीयांच्या उपस्थितीत एक साधेपणाचा आदर्श ठरेल.