अजित पवारांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा व्यक्त; महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला स्पष्ट

ajit Pawar

आगामी विधानसभा निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष लागले असून, या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात घडामोडींचा वेग वाढला आहे. सर्वच पक्ष आपापल्या बाजूने विजय मिळवण्यासाठी जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली आहे, पण काही अडचणींची खंतही व्यक्त केली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अजित पवार म्हणाले, “मला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे, परंतु मी उपमुख्यमंत्रीपदाच्या पलीकडे जाऊ शकत नाही.” त्यांनी २००४ च्या विधानसभा निवडणुकीचे उदाहरण देताना सांगितले की, त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसकडे मुख्यमंत्री पदाची संधी होती. मात्र, पक्ष नेत्यांनी त्या पदाचा दावा सोडून काँग्रेसला ती संधी दिली.

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना अजित पवार यांनी स्पष्ट केले की, महायुतीमधूनच ही निवडणूक लढवली जाणार आहे. २०१९ मध्ये प्रत्येक पक्षाने जिंकलेल्या जागांनुसार यावेळच्या जागावाटपाचे सूत्र ठरवले जाईल. भाजप २०१९ मध्ये जिंकलेल्या जागांवरच निवडणूक लढवणार आहे, तसेच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचाही हाच फॉर्म्युला असेल. “२०० जागांवर जागावाटप निश्चित आहे, तर उर्वरित ८८ जागा मित्रपक्षांमध्ये विभागल्या जातील,” असे अजित पवार यांनी सांगितले.

Leave a Reply