Mumbai : जागावाटपावर अजित पवारांचं मिश्किल उत्तर: ‘जागांची बेरीज करून उद्या सांगतो

ajit Pawar

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्षांमध्ये जागावाटपावर चर्चा सुरू असून या संदर्भात अजित पवारांनी दिलेलं मिश्किल उत्तर सध्या चर्चेचा विषय बनलं आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

माध्यमांनी जागावाटपाबाबत विचारले असता अजित पवारांनी उत्तर दिलं, “किती जागा लढणार याची बेरीज करून उद्या सांगतो.” त्यांच्या या उत्तराने माध्यमांमध्ये हशा पिकला आणि एकाच वेळी संभ्रमही निर्माण झाला.

राजकीय वर्तुळात सध्या जागावाटपावर जोरदार चर्चा सुरू आहे. महाविकास आघाडीत आणि विरोधी पक्षांमध्ये चर्चेच्या बैठका होत आहेत. पवारांच्या या मिश्किल वक्तव्यानं चर्चेला वेगळं वळण मिळालं असून नेमकी कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत.

अजित पवारांनी नेहमीच मिश्किल आणि स्पष्ट शैलीत राजकीय प्रश्नांची उत्तरं दिली आहेत. त्यामुळे या वक्तव्यानंतर आगामी निर्णयावर लक्ष लागून राहिलं आहे.