Nashik School Reopening News – सर्व शाळा १६ जूनपासून सुरू; विद्यार्थ्यांचे भव्य स्वागत करण्याचा निर्णय – शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांचे निर्देश

All schools will open on Monday... Students will be welcomed like this... Minister Bhuse's instructions to the Education Department

Nashik School Reopening News | Maharashtra School Reopen Date | दादाजी भुसे शिक्षण बातमी

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

नाशिक : राज्यातील सर्व शाळा सोमवार, १६ जूनपासून पुन्हा सुरू होणार असून, पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री राज्यभरातील विविध शाळांमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत करतील.

नाशिक जिल्ह्यातील शाळांमध्येही आमदार, लोकप्रतिनिधी व प्रशासन अधिकारी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी हजर राहणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांनी ही माहिती देताना शिक्षण विभागाला गुणवत्ता सुधारणा आणि शाळांमध्ये पटसंख्या वाढवण्यावर लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश दिले आहेत.

शाळा सुरू होताना विद्यार्थ्यांचे स्वागत आणि नव्या उपक्रमांची अंमलबजावणी

शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत मंत्री भुसे बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात झालेल्या या बैठकीत आमदार किशोर दराडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, शिक्षण उपसंचालक डॉ. बी. बी. चव्हाण यांची उपस्थिती होती.

मंत्री भुसे म्हणाले की, “राज्यात अनेक शाळांमध्ये नवे शैक्षणिक उपक्रम यशस्वीरित्या राबवले जात आहेत. हे उपक्रम सर्व शाळांमध्ये पोहोचण्यासाठी नियोजन आवश्यक आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा ओढा वाढवण्यासाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि आधारभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे.”

शिक्षणविषयक योजनांचा सखोल आढावा

बैठकीत पुढील शासकीय योजनांचा आढावा घेण्यात आला:

  • PM श्री शाळा आणि अन्य शासकीय योजनांद्वारे शाळांची पायाभूत सुविधा उभारणी (स्वच्छ पाणी, शौचालय, वर्गखोली इ.)
  • प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण कार्यक्रम
  • राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना
  • इयत्ता ५वी व ८वी शिष्यवृत्ती परीक्षा
  • ‘निपुण महाराष्ट्र’ कृती कार्यक्रम
  • पवित्र पोर्टल शिक्षक भरती – टप्पा २
  • स्मार्ट स्कूल मोहीम – जिल्हा परिषद नाशिक
  • सुपर ५० विद्यार्थी घडविण्याचा उपक्रम
  • कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना
  • शाळा आरोग्य तपासणी व हेल्थ कार्ड वितरण

नव्या शैक्षणिक उपक्रमांचे कौतुक

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी ‘सुपर ५०’सह राबविल्या जाणाऱ्या नवकल्पनांची माहिती दिली. प्राथमिक शिक्षणाधिकारी नितीन बच्छाव यांनी विविध योजनांचे सादरीकरण केले.

या बैठकीस उद्योगमंत्री उदय सामंत यांचीही उपस्थिती होती. त्यांनी शिक्षण विभागाच्या कार्यपद्धतीबद्दल समाधान व्यक्त केले.

शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा

शिंदे गावचे सरपंच बाजीराव जाधव यांचा खास सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढाकारामुळे गावाने शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांची घरपट्टी व पाणीपट्टी माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.