Shocking Ambad police molestation FIR : महामार्गावर पिकअप वाहनात अल्पवयीन मुलीचा विनयभंग : अंबड पोलिसात गुन्हा दाखल

Minor girl rape case Nashik

रविवारी रात्री प्रवासादरम्यान घडली धक्कादायक घटना

Ambad police molestation FIR : एक धक्कादायक प्रकार समोर आला असून महामार्गावर प्रवास करीत असतांना एका पिकअप वाहनाच्या चालकाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला. या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात विनयभंग व पॉक्सो कायद्यान्वये (POCSO Act) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


१६ वर्षीय पीडितेच्या आईने पोलिसात दिली तक्रार (Ambad police molestation FIR)

१६ वर्षीय पीडिता व तिची आई रविवारी (दि. १३ एप्रिल) रोजी विल्होळी भागात गेल्या होत्या. रात्री घरी परतत असतांना त्यांनी महामार्गावरून जाणाऱ्या एका पिकअप मालवाहू वाहनात बसून प्रवास सुरू केला.


सीएनजी पंपाजवळ वाहनात बसलेल्या मुलीचा विनयभंग (Ambad police molestation FIR)

घटना मुंबई-नाशिक महामार्गावरील सीएनजी पंपाजवळ घडली. दोघी पिकअपमध्ये बसल्यानंतर, चालकाच्या बाजूला बसलेल्या अल्पवयीन मुलीचा संशयिताने विनयभंग केला. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


पोलीस तपास सुरू, सहाय्यक निरीक्षक भंडे करीत आहेत पुढील चौकशी

सदर प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. पोलिसांकडून वाहन व चालकाचा शोध घेण्याचे काम सुरू असून, लवकरच आरोपीला अटक केली जाईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.