डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त भव्य देखाव्याची तयारी
छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल
नाशिकरोड (प्रतिनिधी) Ambedkar cultural program Nashik : इतिहासाचे साक्षीदार ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘राजगृह’ बंगल्याची प्रतिकृती यंदा प्रथमच नाशिकरोडमध्ये साकारण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात या भव्य देखाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
तीन मजली ‘राजगृह’ – बाबासाहेबांच्या विचारांची साक्ष (Ambedkar cultural program Nashik)
प्रसिद्ध देखावा निर्माते आनंद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली ४० बाय २० फूट आकाराचा आणि तब्बल २७ फूट उंचीचा तीन मजली ‘राजगृह’ बंगला साकारण्यात येणार आहे.
पहिल्या मजल्यावर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची मूर्ती व २७ फूट उंच तथागत गौतम बुद्धांची भव्य मूर्ती स्थापन केली जाणार आहे.
विशेष आकर्षण म्हणजे – बाबासाहेब जेव्हा अभ्यास करत असत, तेव्हा वापरत असलेली खुर्चीची हुबेहूब प्रतिकृतीही या देखाव्यात समाविष्ट करण्यात आली आहे.
नाशिकरोडमध्ये भव्य सांस्कृतिक सोहळा (Ambedkar cultural program Nashik)
यंदा जयंतीनिमित्त विशेष प्रबोधनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, संपूर्ण परिसरात भव्य रोषणाई करण्यात येणार आहे. विविध सांस्कृतिक सादरीकरण, प्रबोधनात्मक उपक्रम व आंबेडकरी विचारांची प्रसाराची नियोजनबद्ध मांडणी करण्यात येईल.
नागरिकांना आवाहन (Ambedkar cultural program Nashik)
उत्सव समितीचे मुख्य संयोजक सुनील कांबळे, अध्यक्ष मुकेश वीर, माजी न्यायाधीश प्रकाश ताजनपुरे, माजी न्यायाधीश अशोक आव्हाड, तसेच अतुल भावसार, संजय पगारे, डॉ. आप्पा भालेराव, कवी पी. कुमार धनविजय, ॲड. पुष्पा ढवळे, अनिता जगताप, जयश्री बस्ते, पल्लवी गवई, विश्वनाथ होलीन आदींनी हा देखावा प्रत्यक्ष पाहण्यासाठी सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे.
#राजगृहनाशिकरोड #बाबासाहेबआंबेडकर #AmbedkarJayanti2025 #नाशिकरोडघटना #DrAmbedkarRajgruha