In Nashik, the Anti-Narcotics Squad has conducted a major operation.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकमध्ये अंमली पदार्थविरोधी पथकाने मोठी कारवाई करत पाच लाख रुपये किंमतीचे मॅफेड्रॉन (एमडी) अमली पदार्थ ताब्यात घेतले आहेत. या प्रकरणात दोन भाऊ आणि त्यांची पत्नी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संस्थेत आरोपी फैसल शफिन शेख (वय २६), शिबान शफिन शेख (वय २५), आणि शिबानची पत्नी हिना शिबान शेख (वय २९) अशी आहे. हे सर्वजण नाशिकरोड परिसरातील रहिवासी असून पांढऱ्या रंगाच्या स्कोडा कारने एमडी नेण्यासाठी निघाले होते.
अंमली पदार्थविरोधी पथकाने श्रद्धा हॉटेलजवळ कारला थांबवून तपासणी केली. या कारमधून ९९.५ ग्रॅम वजनाचे, सुमारे ४ लाख ९७ हजार ५०० रुपये किमतीचे एमडी जप्त करण्यात आले. ही कारवाई पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन चौधरी आणि त्यांच्या टीमने केली.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अमली पदार्थविरोधी पथक करत आहे. नाशिकरोड भागातील एमडी विक्रीच्या घटनांनी मागील वर्षी मोठी खळबळ माजवली होती. विशेषतः ललित पाटीलने शिंदे गावात एमडी चा कारखाना चालवून राज्यभर विक्री करण्याचे काम केले होते. त्याच्या प्रकरणात अनेक पोलिस अधिकाऱ्यांचे बदल्या देखील करण्यात आल्या होत्या.