Asmita Khelo India वेटलिफ्टिंग स्पर्धा : मनमाडमध्ये पहिल्यांदाच महिला वेटलिफ्टिंगचा जल्लोष, मेघा संतोष आहेर सर्वोत्तम

download 69 2

मनमाड (नाशिक) Asmita Khelo India – भारतीय क्रीडा प्राधिकरण, भारतीय वेटलिफ्टिंग संघटना, नाशिक जिल्हा वेटलिफ्टिंग संघटना आणि जय भवानी व्यायामशाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड शहरात प्रथमच अस्मिता खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग स्पर्धा उत्साहात पार पडली. या स्पर्धेला महिला खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

उद्घाटन कार्यक्रमास सिद्धी क्लासेसच्या संचालिका भाग्यश्री दराडे, छत्रे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता पोद्दार, माजी नगराध्यक्ष योगेश पाटील, जय भवानी व्यायामशाळेचे पोपट बेदमुथा, डॉ. दत्ता शिंपी, राजेश परदेशी, आंतरराष्ट्रीय खेळाडू निकिता काळे, आकांक्षा व्यवहारे आणि प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे उपस्थित होते.

स्पर्धेत सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मेघा संतोष आहेर हिने पटकावला. तांत्रिक अधिकारी म्हणून डॉ. विजय देशमुख, राजेंद्र सोनवणे, सुनील दळवी, योगेश चव्हाण, योगेश महाजन, तुषार सपकाळे, कल्पेश महाजन, भाऊसाहेब खरात, पंकज त्रिवेदी यांनी काम पाहिले. आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांनी खेळाडूंना प्रोत्साहनपर टी-शर्ट दिले. तसेच, विनोद सांगळे यांनी कै. बंडू नानासांगळे यांच्या स्मरणार्थ स्मृतीचिन्ह प्रदान केले.

आर्थिक सहाय्यासाठी डॉ. शरद शिंदे आणि माजी नगरसेवक महेंद्र शिरसाठ यांचे विशेष योगदान लाभले. प्रास्ताविक प्रवीण व्यवहारे यांनी केले, सूत्रसंचालन आनंद काकडे यांनी केले तर आभार प्रशांत सानप यांनी मानले. आयोजन यशस्वी करण्यासाठी कुणाल गायकवाड, मुकेश निकाळे, मुकुंद आहेर, जयराज परदेशी, पूजा परदेशी, खुशाली गांगुर्डे, नूतन दराडे, पवन निर्भवणे, सुनील कांगणे, सुरेश नेटारे यांनी परिश्रम घेतले.

जय भवानी व्यायामशाळेचे अध्यक्ष डॉ. विजय पाटील, मोहन गायकवाड आणि डॉ. सुनील बागरेचा यांनी विजेत्या खेळाडूंचे कौतुक केले.

आठ वजनी गटांतील विजेते (Asmita Khelo India)

  • 44 किलो : दिव्या सोनवणे, श्रेया सोनार, भाग्यश्री पवार
  • 48 किलो : विनाताई आहेर, श्रावणी पुरंदरे, वैष्णवी शुक्ला
  • 53 किलो : मेघा आहेर, पूर्वा मौर्य, शामल तायडे
  • 58 किलो : आर्या पगार, मुग्धा माळी, कावेरी वाबळे
  • 63 किलो : प्रांजल आंधळे, साक्षी पवार, हर्षिता कुंगर
  • 69 किलो : अक्षरा व्यवहारे, श्रावणी सोनार, श्रावणी मंडलिक
  • 77 किलो : करुणा गाढे, प्रांजल कुनगर, ऐश्वर्या गांगुर्डे
  • 77 किलो वरील : कस्तुरी कातकडे, श्रद्धा माळवतकर, करिष्मा शहा