Baban Gholap : घोलप नाना वाजवणार तुतारी

babanrao-gholap-expected-to-join-ncp-sharad-pawar-faction-shiv-sena-shinde-group-facing-blow-in-deolali

latest News : माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते बबनराव घोलप लवकरच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यांच्या या निर्णयामुळे देवळाली मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलू शकतात आणि आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. घोलप हे पाच वेळा देवळाली मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आले आहेत, तर त्यांच्या पुत्र योगेश घोलप यांनी देखील एकदा या मतदारसंघातून विजय मिळवला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

गेल्या आठ महिन्यांपूर्वी, बबनराव घोलप यांनी शिवसेना ठाकरे गटाला सोडून शिंदे गटात प्रवेश केला होता. त्यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीसाठी प्रचारही केला होता, मात्र शिंदे गटाकडून सन्मान मिळाला नाही मिळाल्यामुळे ते नाराज होते. यामुळे देवळाली मतदारसंघाच्या जागेबाबत अनिश्चितता आणि शरद पवार गटाकडे जाण्याची शक्यता यामुळे नुकतीच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या देवळाली मतदारसंघासाठी अनेक इच्छुक उमेदवार आहेत, पण बबनराव घोलप यांची पक्षप्रवेशाची तयारी ही निवडणुकीसाठी महत्त्वपूर्ण ठरू शकते. त्यांच्या प्रवेशानंतर, योगेश घोलप यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. शरद पवार यांच्या भेटीदरम्यान घोलप यांनी देवळाली मतदारसंघातील स्थितीबाबत चर्चा केली असून, त्यांचा पक्षप्रवेश लवकरच अधिकृत होण्याची शक्यता आहे.

बबनराव घोलप यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशामुळे देवळालीत शिवसेना शिंदे गटाची स्थिती कमकुवत होऊ शकते, आणि महाविकास आघाडीच्या ताकदीत वाढ होऊ शकते.