Bhujbal absence : भुजबळांच्या अनुपस्थितीने चर्चांना उधाण; राष्ट्रवादीत ‘वेट अँड वॉच’चा (Wait and watch strategy) खेळ सुरू?

Chhagan Bhujbal Maharashtra Politics OBC Leadership Cabinet Expansion Governor Post Rejection

नाशिक : महायुती सरकारच्या शपथविधीला दोन महिने पूर्ण होऊनही छगन भुजबळ Bhujbal यांच्या भूमिकेवर पडदा कायम आहे. नुकत्याच मुंबईत झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीतही माजी उपमुख्यमंत्री भुजबळ गैरहजर राहिल्याने पक्षाच्या वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगल्या आहेत. भुजबळांकडून घेतली जाणारी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका पक्षातल्या अंतर्गत दरीची जाणीव करून देते आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

१५ डिसेंबरला नागपूरमधील राजभवनात महायुती सरकारचा शपथविधी पार पडला. मात्र, भुजबळ यांचे नाव शपथविधी यादीत नव्हते. या घटनेनंतर भुजबळ Bhujbal समर्थकांमध्ये अस्वस्थता वाढली. नाराजीच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर भुजबळांनी विविध कार्यक्रमांमधून आपली स्वतंत्र ओळख ठळक करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अजित पवार किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यासह कोणत्याही नेत्यांनी त्यांच्याशी संवाद साधण्याची जबाबदारी घेतल्याचे दिसून आले नाही.

शिबिरात भुजबळांचा Bhujbal सहभाग अनिश्चित
राष्ट्रवादीच्या आगामी शनिवार-रविवारी होणाऱ्या शिबिरात भुजबळ Bhujbal सहभागी होणार का, हा मोठा प्रश्न आहे. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न केला असला तरी त्याला भुजबळांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही, असे बोलले जात आहे. त्यामुळे भुजबळ आणि पक्ष नेतृत्वामध्ये वाढत असलेली दरी चर्चेचा विषय ठरली आहे.

मोदी यांच्या बैठकीलाही अनुपस्थित
गेल्या बुधवारी पंतप्रधान मोदी यांच्या आमदार बैठकीलाही भुजबळ गैरहजर होते. मुंबईत उपस्थित असूनही भुजबळ यांनी बैठकीत सहभाग घेतला नसल्याने त्यांनी ‘वेट अँड वॉच’ची भूमिका कायम ठेवली असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भुजबळांची भूमिका – साईड ट्रॅक की नव्या डावपेचाची तयारी?
भुजबळांच्या आतापर्यंतच्या राजकीय वाटचालीवर नजर टाकल्यास ते शांत बसतील, अशी शक्यता कमीच आहे. सध्याच्या राजकीय घडामोडी त्यांच्या नव्या डावपेचांच्या तयारीकडे इशारा करत असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे आगामी काळात भुजबळांची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांचा खेळ सुरू
भुजबळांच्या शांततेला खरेच ‘वेट अँड वॉच’ म्हणायचे की नव्या राजकीय समीकरणांची तयारी, हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र, सध्याच्या घडामोडींनी राष्ट्रवादीच्या अंतर्गत राजकारणाला नवीन वळण मिळाले आहे, हे निश्चित.