बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा विजेता रीलस्टार सूरज चव्हाण ठरला आहे, तर उपविजेता गायक अभिजीत सावंत होता, आणि तिसऱ्या स्थानावर अभिनेत्री निक्की तांबोळी होती. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत निक्कीला सूरजच्या विजयाबद्दल विचारले गेले. निक्कीने यावर अत्यंत समंजसपणे तिची प्रतिक्रिया दिली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
सूरज चव्हाणच्या विजयाबद्दल निक्कीचं मत
निक्कीला विचारण्यात आलं की, “सूरज चव्हाण हा शो जिंकेल, असं वाटलं होतं का?” यावर निक्की म्हणाली, “मला कल्पना नव्हती, पण जर चाहत्यांनी त्याला जिंकवलं, तर त्याचा आदर मी नक्कीच करणार आहे. कारण जे तुमच्या नशीबात आहे तेच तुम्हाला मिळतं. कदाचित माझ्या नशिबात ट्रॉफी नव्हती, पण त्याच्या नशिबात होती. माझ्या नशिबात खूप प्रेम होतं आणि ते मला मिळालं, त्यामुळे मी खूप खूश आहे.” निक्कीने तिच्या नशिबावर विश्वास असल्याचे सांगितले आणि म्हटले की ती कधीच निराश होत नाही.
सहानुभूतीवर विजय?
निक्कीने त्याच्या विजयाबद्दल उठलेल्या काही आरोपांवर भाष्य केले, “मी काही अशा कमेंट्स वाचल्या की, तो सहानुभूतीमुळे जिंकला आहे. पण हे नेहमीच असंच चालत राहणार. जर मी ट्रॉफी जिंकलं असतं तर माझ्या चाहत्यांनी दुसऱ्यांचा द्वेष केला असता. आता त्याचे चाहते माझा द्वेष करतात. त्यामुळे सत्य स्वीकारून पुढे जाणं हेच योग्य आहे.”
शोतील वर्तनाची खंत
निक्कीने तिच्या वर्तनाबद्दल खंत व्यक्त केली, विशेषतः ज्याप्रकारे तिने वर्षा उसगांवकरांशी उद्धटपणे वागले, त्याबद्दल ती खंतावली आहे. “मी त्यांची माफी मागितली होती आणि मला शो गाजवायचा होता, ते मी केलं,” असं निक्की म्हणाली.
सूरजच्या विजयावरील आधीची प्रतिक्रिया
निक्कीने यापूर्वीही सूरजच्या विजयावर आनंद व्यक्त केला होता. “सूरज हा सर्वात वेगळा आणि खूप पात्र स्पर्धक होता. त्याचा खेळ आणि त्याची वैयक्तिकता वेगळी होती. मी त्याला राखी बांधली आहे आणि तो ट्रॉफीचा खरा हकदार होता,” असं ती म्हणाली होती.
निक्की तांबोळीला शो न जिंकल्याचं दु:ख नाही, पण तिचा नशिबावर असलेला विश्वास आणि आयुष्यातल्या अनुभवांची समज निश्चितच प्रेरणादायी आहे.