नाशिक (Nashik News): Birhad Andolan Nashik
गत 40 दिवसांपासून सुरू असलेल्या बिर्हाड आंदोलनाला आता निर्णायक वळण मिळाले आहे. संतप्त रोजंदारी कर्मचार्यांकडून 25 ऑगस्ट 2025 रोजी “जनआक्रोश उलगुलान मोर्चा“ काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये गाई, म्हशी, बैल, शेळ्या, कोंबड्या, गुरेढोरे व शेती अवजारे घेऊन आंदोलक सहभागी होणार आहेत.
ठळक मुद्दे (Highlights)
- 9 जुलै 2025 पासून बिर्हाड आंदोलन सुरू
- 250 ते 300 रोजंदारी कर्मचारी आंदोलनात ठिय्या देत बसले
- 25 ऑगस्टला नाशिकमध्ये मोठा उलगुलान मोर्चा
- विविध आदिवासी संघटनांचा सक्रिय सहभाग
- मागण्या :
- बाह्यस्त्रोत भरती प्रक्रिया रद्द करावी
- रोजंदारी कर्मचार्यांना नियमित कामावर हजर राहण्याचे आदेश द्यावेत
आंदोलनाचा मार्ग (Morcha Route)
मोर्चा तपोवनातील मोदी मैदानावरून सुरू होईल आणि आडगाव नाका, निमाणी, पंचवटी कारंजा, अहिल्याबाई होळकर पूल, रविवार कारंजा, एम.जी. रोड, जिल्हाधिकारी कार्यालय, सीबीएस मार्गे आदिवासी आयुक्तालयावर धडकणार आहे.
आंदोलनाची पार्श्वभूमी
- 9 जुलै 2025 पासून आदिवासी आयुक्तालयासमोर 250 ते 300 रोजंदारी कर्मचारी ठिय्या देऊन बसले आहेत.
- आंदोलनकर्त्यांना मंत्री, खासदार व आमदारांचा पाठिंबा लाभला आहे.
- प्रशासनाने बाह्यस्त्रोत भरती प्रक्रियेने अन्याय केला असल्याचा आरोप आंदोलकांचा आहे.
- आयुक्तालयात प्रवेश न दिल्यास आंदोलक कोंबड्या आत सोडून आंदोलनाचा आवाज उठवणार असल्याचा इशारा दिला आहे.
नेत्यांची भेट (Birhad Andolan Nashik)
आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीही भेट घेतली. शिंदेंनी आदिवासी आयुक्तांना आंदोलकांना छताखाली बसण्याची परवानगी द्यावी, तसेच लवकरच समाधानकारक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.