BJP : नाशिकमध्ये भाजप सदस्य अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद: तीन मतदारसंघांतील 1250 सदस्यांची नोंदणी

नाशिकमध्ये भाजप सदस्य अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद: तीन मतदारसंघांतील 1250 सदस्यांची नोंदणी

भारतीय जनता पक्षाने BJP नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरू केलेल्या सदस्य अभियानाला महाराष्ट्रभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिकच्या तीन प्रमुख मतदारसंघांमध्ये या अभियानाअंतर्गत 1250 नागरिकांनी सदस्यत्व नोंदणी केली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अल्पसंख्याक व महिला पदाधिकाऱ्यांनी यात महत्त्वपूर्ण सहभाग नोंदवला आहे. नाशिक पूर्व मतदारसंघात झालेल्या या उपक्रमात भाजपचे BJP सरचिटणीस सुनील केदार, माजी नगरसेविका रुची कुंभारकर, तपोवन मंडळ अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, ज्येष्ठ नेते हाजी अहमद अबू काजी, अल्पसंख्याक शहराध्यक्ष आरिफ अहमद काजी, जिल्हा सरचिटणीस फिरोज उर्फ राजू शेख, महिला अध्यक्ष हिना शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

अभियानादरम्यान महिला उपाध्यक्ष नाजिया खाटीक, रिजवान लाल सय्यद, रोजमिन पठाण तसेच उपाध्यक्ष रफिक सय्यद, मुनाफ शेख, जलील शेख यांसह इतर पदाधिकाऱ्यांनी सदस्य नोंदणीसाठी विशेष योगदान दिले.

अल्पसंख्याक शहराध्यक्ष आरिफ अहमद काजी यांनी सांगितले की, “भारतीय जनता पक्षाने BJP नाशिकमध्ये सर्वसमावेशकता व सामाजिक एकोपा यावर भर दिला आहे. त्यामुळेच अल्पसंख्याक आणि महिलांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत आहे.”