दोन माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश | एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत नवा राजकीय डाव
नाशिक सिडको : BJP Entry Shinde Group नाशिकमधील सिडको परिसरात शिवसेना (ठाकरे गट) ला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे माजी नगरसेवक पुंजाराम गामणे आणि माजी नगरसेविका किरण दराडे-गामणे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
मुंबईत औपचारिक प्रवेश सोहळा
मंगळवार, दिनांक १७ जून रोजी सकाळी ११ वाजता मुंबई येथे झालेल्या या प्रवेश सोहळ्याला शिंदे गटाचे वरिष्ठ नेते दादा भुसे, अजय बोरस्ते आणि महानगरप्रमुख प्रविण तिदमे उपस्थित होते. या प्रवेशामुळे सिडको परिसरात शिंदे गटाची पकड आणखी बळकट झाली आहे. (BJP Entry Shinde Group)
ठाकरे गटाला ‘सिडको’तून मोठे भगदाड
शिवसेनेच्या ठाकरे गटासाठी सिडकोमधून दोन प्रभावशाली स्थानिक नेत्यांचे बाहेर पडणे राजकीयदृष्ट्या मोठा झटका मानला जात आहे. दोन्ही नेत्यांचा स्थानिक जनाधार मजबूत असल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत याचा परिणाम जाणवण्याची शक्यता आहे.
शिंदे गटाचा विस्तार वेगात सुरू
या प्रवेश सोहळ्यावेळी सिडकोसह इतर भागांतीलही काही कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळे नाशिकमध्ये शिंदे गटाचे संघटन दिवसेंदिवस बळकट होत असल्याचे स्पष्ट होत आहे.