मुंबई: राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचालींना वेग आला असून,भाजप BJP आणि महायुतीचे नेते उद्या सायंकाळी ३.३० वाजता राज्यपाल राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्ता स्थापनेचा दावा करणार आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
भाजपकडून BJP उद्या सकाळी ११ वाजता विधीमंडळ गटनेत्याची निवड केली जाणार आहे. या प्रक्रियेसाठी भाजपचे BJP निरीक्षक विजय रुपाणी मुंबईत दाखल झाले आहेत. गटनेता निवडल्यानंतर महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे राज्यपालांना भेटून सरकार स्थापनेसाठी आवश्यक असलेले पत्र सादर करतील.
भाजपने BJP आधीच महायुतीच्या इतर घटक पक्षांची पाठिंबा पत्रे गोळा केली असून, सत्ता स्थापनेसाठी लागणारे संख्याबळ त्यांच्याकडे असल्याचा दावा केला जात आहे.
महत्त्वाचे मुद्दे:
सकाळी ११.०० वाजता भाजप BJP विधीमंडळ गटनेत्याची निवड.
सायंकाळी ३.३० वाजता राज्यपालांशी भेट.
महायुतीचे नेते सामूहिकपणे सत्ता स्थापनेचा दावा करणार.
राज्याच्या राजकारणातील या हालचालींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
हे पण वाचा : BJP : बच्चू कडू : “मी शिंदेंना सांगितलं होतं की भाजपाकडून…” मुख्यमंत्रीपदाबाबत मोठं वक्तव्य!