नाशिक – भाजपाची Bjp देशात प्राथमिक सदस्य नोंदणी मोहिम सुरु आहे. दर तीन वर्षांनी भाजपा सदस्य नोंदणी होते. पुर्वी पावती पुस्तकाव्दारे सदस्य नोंदणी होत असे, आता ऑनलाईन सदस्य नोंदणी केली जाते. त्याकरिता मोबा.- 8800002024 व्दारे कोणीही सदस्य होऊ शकते. नाशिक शहराकरिता सदस्य नोंदणी प्रमुख म्हणून माजी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची नियुक्ती भाजपा प्रदेशाने केली आहे. यापुर्वी प्रदेश भाजपाची सदस्य नोंदणी कार्यशाळा नागपूर येथे संपन्न झाली होती. आता नाशिक महानगर जिल्हयाची भाजपा सदस्य नोंदणी कार्यशाळा डॉ.भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
याप्रसंगी त्यांनी मनोगत व्यक्त केले. भाजपा Bjp हा पक्ष सदस्य संख्या असलेला देशातील नव्हे तर जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. देशात नागरीक स्वेच्छेने मोबाईलव्दारे ऑनलाईन भाजपाचे सदस्य होतात. तसेच सदस्य झाल्यानंतर स्वेच्छेने ऑनलाईन भाजपाला देणगीपण देतात. तथापी पक्ष संघटनेच्या माध्यमामधून बूथ प्रमुख, सर्व लोकप्रतिनिधी, स्थानिक ते सर्व केंद्रीय पदाधिकारी यांनी त्यांना दिलेले सदस्य नोंदणीचे उद्दिष्ट पुर्ण करावे व नाशिक शहराचा महाराष्ट्रात सदस्य नोंदणीचा उच्चांक नोंदवावा असे आवाहन डॉ.भारती पवार यांनी केले. याप्रसंगी ऑनलाईन सदस्य नोंदणी कशा पध्दतीने करावी हे पी.पी.टी.व्दारे स्क्रिनवर डेमोव्दारे दाखविण्यात आले. भविष्यात ज्यांना पदाधिकारी, नगरसेवक अथवा पक्षाच्या विविध पदांवर जायचे आहे. त्या सर्वांनी प्राथमिक सदस्य नोंदविने अनिवार्य असल्याचे अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले. भाजपाचे सदस्य होण्यास अनेकजण इच्छुक आहेत फक्त पदाधिकारी, कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी यांनी संपर्क मोहिम राबवून त्यांना सदस्य करावे असे त्यांना सांगितले.
यावेळी दुबई अबुधाबी येथील आयोजित जागतिक मार्शल आर्ट स्पर्धेत नाशिक येथील रौप्य पदक विजेत्या प्रथमेश दातीर याचा सत्कार माजी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी माजी केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार, भाजपा शहराध्यक्ष प्रशांत जाधव, प्रदेश प्रवक्ते लक्ष्मण सावजी, विजय साने, मा.आ.बाळासाहेब सानप, माजी महापौर सतिश कुलकर्णी, सरचिटणीस सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, ॲड.श्याम बडोदे, रोहिणी नायडू, गिरीष पालवे, प्रदिप पेशकार, गणेश कांबळे, शांताराम घंटे, सुनिल देसाई,भास्कर घोडेकर, भगवान काकड, अविनाश पाटील,ज्ञानेश्वर काकड, राजेंद्र जडे, माधुरी पालवे, सागर शेलार, प्रविण भाटे, अमित घुगे, बापु शिंदे, सतिष सोनवणे, राकेश दोंदे,चंद्रकांत खोडे, चंद्रशेखर पंचाक्षरी, राहुल कुलकर्णी, धनंजय पुजारी, महेश महंकाळे, आरिफ काझी,शिल्पा तांबोळी, सुरेखा निकम, यशोदा पर्वतकर, डॉ.चंद्रशेखर नामपुरकर, डॉ.भालचंद्र ठाकरे, राजनंदिनी अहिरे, सुरेखा पेखळे,संदिप शिरोळे,प्रशांत वाघ, उदया जोशी, बाळासाहेब पाटील, शाहिन मिर्झा, राजेश दराडे, गणेश बोलकर आदिंसह बूथ प्रमुख, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित होते.