Nashik Political Update | BJP Mega Entry Movement Sparks Discontent
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक – BJP News Nashik आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात (BJP) सुरु असलेल्या मेगा पक्षप्रवेश मोहिमेमुळे पक्षांतर्गत अस्वस्थतेला तोंड फुटले आहे. विशेषतः ज्यांनी मागील निवडणुकांमध्ये पक्षासाठी जीवतोड मेहनत घेतली, त्यांच्याच विरोधात लढलेल्यांना भाजपमध्ये स्थान दिल्याने निष्ठावंतांमध्ये नाराजीचा सूर वाढत आहे.
BJP News Nashik – महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पक्षप्रवेशाचा सपाटा
नाशिक महापालिका निवडणुकीत ‘100+’ जागा जिंकण्याचा निर्धार भाजपने घेतला असून, या मोहिमेचा भाग म्हणून विरोधी पक्षातील माजी नगरसेवक, उपनेते, पदाधिकाऱ्यांना पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश दिला जात आहे. यामध्ये शिवसेना (उबाठा) चे माजी उपनेते सुधाकर बडगुजर, माजी मंत्री बबन घोलप यांचा समावेश आहे.
निष्ठावंत कार्यकर्त्यांमध्ये नाराजी, तिकीट कपातीची भीती
पक्षासाठी गुन्हे अंगावर घेऊन, वैयक्तिक वैर पत्करून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आता तिकीट मिळेल का, याची अनिश्चितता आहे. विरोधात लढणाऱ्यांना पक्षात घेतल्यामुळे आमचं काय, असा संतप्त सवाल कार्यकर्ते विचारत आहेत. या अस्वस्थतेने आता गटबाजीचं रूप धारण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आमदारांचाही विरोध स्पष्ट
नाशिक पश्चिम मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाला स्पष्ट विरोध दर्शवला आहे. जलसंपदामंत्री गिरीश महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या पुढाकाराने झालेला हा प्रवेश स्थानिक आमदारांसाठी प्रश्नचिन्ह बनला आहे.
वरिष्ठ नेतृत्वाकडून निर्णयाची अपेक्षा
भाजपमध्ये सध्या सुरू असलेल्या खुल्या प्रवेशामुळे पक्षात असंतोष वाढला आहे. प्रत्येक नव्या प्रवेशासोबत कार्यकर्त्यांची अस्वस्थता देखील वाढते आहे. ही भावना आता वरिष्ठ नेत्यांपर्यंत पोहोचली असून, लवकरच पक्षाकडून या विषयावर स्पष्ट भूमिका घेतली जाईल, अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे.