Latest News on Vidhansabha Election 2024 BPJ First List: भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी पहिली ९९ उमेदवारांची यादी जाहीर केली असून, यात काही महत्त्वाच्या नेत्यांच्या नातेवाईकांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या मुलीला देखील या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्यामुळे पक्षाच्या अंतर्गत निर्णय प्रक्रियेत कौटुंबिक राजकारणाचाही प्रभाव दिसून येत आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक जिल्ह्यातील विद्यमान आमदारांना पुन्हा संधी देण्यात आलेली आहे. नाशिक पश्चिमचे आमदार सीमा हिरे, नाशिक पूर्वचे आमदार राहुल ढिकले, आणि बागलाणचे दिलीप बोरसे यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली आहे. मात्र, यादीतील सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे नाशिक मध्यचे आमदार प्रा. देवयानी फरांदे यांचे नाव यादीत नाही. फरांदे यांचा या भागात चांगला जनसंपर्क असूनही पक्षाने त्यांना यावेळी संधी दिलेली नाही, ज्यामुळे नाशिकमध्ये राजकीय चर्चेला उधाण आले आहे.
चांदवडमध्ये पक्षाने पुन्हा डॉ. राहुल आहेर यांना उमेदवारी दिली आहे, याचे कारण म्हणजे यापूर्वी राहुल आहेर यांनी माघार घेतल्याची घोषणा केली होती. त्यांनी त्यांच्या बंधु केदा आहेर यांना उमेदवारीसाठी शिफारस केली होती, पण पक्षाने त्यांच्या माघारीची दखल न घेता पुन्हा डॉ. राहुल आहेर यांनाच संधी दिली आहे. या निर्णयामुळे चांदवडमध्ये स्थानिक राजकीय समीकरणं बदलली आहेत.
भारतीय जनता पक्षाने अनुभवास प्राधान्य देत विद्यमान आमदारांवर विश्वास ठेवला आहे, तर काही ठिकाणी कौटुंबिक नातेवाईकांना संधी देण्यात आली आहे. या यादीमुळे आगामी निवडणुकीत भाजपच्या रणनीतीत कोणते बदल दिसणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.






