४१ अंशांवर पोहोचलेल्या तापमानामुळे बदलत्या सिग्नल वेळा
Nashik signals : शहरात गेल्या काही दिवसांपासून प्रचंड तापमानवाढ होत असून, एप्रिल महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात कमाल तापमान ४१.३ अंशांवर पोहोचले. यामुळे दुपारच्या वेळेस सिग्नलवर (signals)उभे राहणे वाहनचालकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यामुळे शहर वाहतूक शाखेने १ ते ४ युनिटमधील ३० सिग्नल्स दुपारी १ ते ४ या वेळेत ‘ब्लिंकर्स’वर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
वाहतूक कोंडी आणि सिग्नल (signals) उल्लंघन टाळण्यासाठी निर्णय
वाहतूक पोलिसांच्या निरीक्षणात आल्याप्रमाणे, उन्हामुळे वाहनचालक सिग्नलचे पालन करत नसल्याने सिग्नल उल्लंघनाचे प्रमाण वाढले आहे. परिणामी, अनेक ठिकाणी वाहतूककोंडी उद्भवत आहे. सहायक पोलिस आयुक्त पद्मजा बढे यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार करत यावर उपाय सुचवले.
सिग्नल्सची विभागणी : नियमित व ब्लिंकर्सवर असलेले सिग्नल
नियमितपणे कार्यरत राहणारे सिग्नल:
- त्र्यंबकनाका सिग्नल
- गडकरी चौक
- उंटवाडी चौक
- एबीबी चौक
- जेहान चौक
- काठे गल्ली
- सीबीएस चौक
- जुना सीटीबी चौक
- जुना गंगापूर नाका
- मेहेर चौक
- आयटीआय चौक
- पपया नर्सरी चौक
- पाथर्डी फाटा चौक
- विजय-ममता चौक
- सम्राट चौक
- उपनगर नाका
- दत्तमंदिर चौक
- बिटको चौक
ब्लिंकर्सवर ठेवले जाणारे सिग्नल:
- ड्रीम कॅसल
- पेठ नाका
- काट्या मारुती चौक
- मालेगाव स्टॅण्ड
- तारवालानगर
- नांदूर नाका
- मिर्ची चौक
- स्वामीनारायण चौक
- आरटीओ कॉर्नर
- बाजार समिती चौक
- जिजाऊ चौक
- खडकाली सिग्नल
- पाइपलाइन रोड सिग्नल
- कॉलेजरोड (हॉलमार्क चौक)
- पारिजातनगर
- जलतरण तलाव चौक (त्र्यंबकरोड)
- तिबेटियन चौक सिग्नल
- कॅनडा कॉर्नर सिग्नल
- रेडक्रॉस सिग्नल
- बारदाना फाटा चौक सिग्नल
- वडाळा रोड सिग्नल (सह्याद्री)
- सिब्बल सिग्नल
- अशोकामार्ग पोलिस चौकी सिग्नल
- त्रिमूर्ती चौक
- साईनाथनगर
- कलानगर
- सातपूर महिंद्र चौक
- समृद्धी टी-पॉइंट
- विहितगाव चौक
- जेलरोड पाण्याची टाकी
वाहनचालकांसाठी सूचना
वाहतूक विभागाने नागरिकांना दुपारच्या वेळेस गरज असल्यासच प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. तसेच, ब्लिंकर्स सिग्नल असलेल्या ठिकाणी सावधगिरी बाळगावी, असेही आवर्जून सांगितले आहे.