बृहन्मुंबई महानगर पालिकेने BLACKLIST केलेल्या RPS कंपनीला १५०० कोटींचे टेंडर दिल्याचा जितेंद्र आव्हाड यांचा आरोप

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी बृहन्मुंबई महानगर पालिकेवर टीका करत, काळ्या यादीत टाकलेल्या RPS कंपनीला १५०० कोटी रुपयांचे सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

आव्हाड यांनी सांगितले की, २०१६ साली या कंपनीवर निकृष्ट दर्जाची कामे केल्यामुळे कारवाई झाली होती.२०१६ च्या रस्ते घोटाळ्याप्रकरणी RPS कंपनीविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली होती, तसेच दोन संचालकांना अटकही करण्यात आली होती.

मात्र, २०१९ साली अचानकपणे या कंपनीवरील बंदी उठविण्यात आली. बंदी असून आणि पूर्वीच्या निकृष्ट कामाच्या आरोपांनंतरही, बृहन्मुंबई महानगर पालिकेने RPS कंपनीला दोन टेंडर दिले. आव्हाड यांनी महानगर पालिकेच्या या निर्णयावर प्रश्न उपस्थित करत, पालिकेचा कारभार अनागोंदी पद्धतीने सुरू असल्याची टीका केली आहे

https://x.com/Awhadspeaks/status/1841783801409675674?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1841783801409675674

Leave a Reply