Chhava Movie Housefull : ‘छावा’ सिनेमाची तुफान कमाई! पहाटेचेही शो हाऊसफुल्ल

Chhava movie

छत्रपती संभाजी महाराजांवरील ‘छावा’ सिनेमाला जबरदस्त प्रतिसाद

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Chhava Movie : छत्रपती संभाजीराजेंच्या शौर्यावर आधारित ‘छावा’ (Chhava Movie)या चित्रपटाने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान मिळवले आहे. पहिल्याच दिवशी थिएटर हाऊसफुल्ल असल्यामुळे अनेक ठिकाणी मध्यरात्री व पहाटेचे शो ठेवले गेले आहेत. पुण्यातील सिटी प्राईड (सातारा रोड) थिएटरमध्ये रविवारी मध्यरात्री १२.५० आणि पहाटे ५.५० वाजता विशेष शो ठेवण्यात आले होते.

विकी कौशलच्या अभिनयाने प्रेक्षक भावूक

सिनेमात छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणारा विकी कौशल याच्या अभिनयाचे कौतुक होत आहे. सिनेमागृहात हाऊसफुल्ल गर्दी पाहून तोही भारावून गेला आहे. “तुमच्या सर्वांचं प्रेम पाहून माझं मन भरून आलंय,” अशी भावनिक पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवर शेअर करत चाहत्यांचे आभार मानले.

‘छावा’ सिनेमाची (Chhava Movie) दमदार बॉक्स ऑफिस कमाई

लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित ‘छावा’ने बॉलिवूडसाठी २०२५ ची जबरदस्त सुरुवात केली आहे. इंडस्ट्री ट्रॅकर सॅकनिल्कच्या अहवालानुसार,

  • पहिला दिवस: ₹33.1 कोटी
  • दुसरा दिवस: ₹39.3 कोटी
  • तिसरा दिवस: ₹48.5 कोटी
  • एकूण कमाई: ₹120 कोटींहून अधिक

चित्रपटाच्या निर्मितीसाठी ₹130 कोटी खर्च करण्यात आले असून, लवकरच हा खर्च वसूल होण्याची शक्यता आहे.

‘छावा’ची लोकप्रियता वाढतच जाणार!

छत्रपती संभाजीराजेंच्या जीवनावर आधारित हा चित्रपट इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणी ठरत आहे. प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहता ‘छावा’ आगामी दिवसांत अजून मोठी कमाई करेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.