मनसे शिवसेना युतीबाबत राज्यात जोरदार चर्चा असतांना यावर मनसेचे युवा नेते Amit Thackeray यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. ते म्हणाले की, दोन्ही भाऊ एकत्र आले तर मला काही प्रॉब्लेम नाही. मात्र त्यांची इच्छा असेल तर त्यांनी फोन करावा. दोघांकडे एकमेकांचे नंबर आहे. आम्ही बोलून काही फरक पडणार नाही. दोन भावांनी एकत्र यावे हे त्यांनी ठरवावे. Raj Thackeray यांची इच्छा असेल ती माझी इच्छा. पुढाकार कोणी घ्यावा हे त्यांनी ठरवावं, आम्ही बोलून काही उपयोग नाही असेही Amit Thackeray यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी Raj Thackeray आणि Uddhav Thackeray बोलले तर होईल. आम्ही खालची लोक बोलून अर्थ नाही, मला कोणालाही मूर्ख बनवायचं नाही. आम्ही याआधी संवाद साधला आहे. आता दोघांकडे फोन आहे. त्यांनी बोललं पाहिजे. आम्ही २०१४- १७ मध्ये प्रस्ताव दिला होता. तेव्हा काय झाले शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही थांबलो होतो. आता त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे. तर पुढे यावं. आम्हाला एकत्र येण्यावर काहीही इशू नाही असेही Amit Thackeray म्हणाले.
काल Aaditya Thackeray यांचे वक्तव्य आले. त्यानंतर आज Amit Thackeray यांचे देखील वक्तव्य आले. त्यामुळे मनसे शिवसेना युतीबाबत सकारात्मक पाऊल पुढे जात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.