Breaking Raj Thackeray – Devendra Fadnavis Secret Meeting : “राज ठाकरे – फडणवीसची 1 तासाची ‘गुप्त भेट’: मनसे-शिवसेना युतीला धोका?”

Raj Thackeray - Devendra Fadnavis Secret Meeting

(Raj Thackeray – Devendra Fadnavis Secret Meeting Sparks Political Earthquake)

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


12 जून सकाळी वांद्रेच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये गुप्त चर्चा

Shocking Political Move Ahead of Mumbai Municipal Elections 2025?


MNS – BJP जवळ येणार? शिवसेना (UBT) – मनसे युतीला ब्रेक?

राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवणारी घटना आज (12 जून, गुरुवार) सकाळी वांद्रे येथील ताज लँड्स एंड हॉटेलमध्ये घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis )आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची अचानक गुप्त भेट झाली आहे. या भेटीमुळे शिवसेना (UBT) आणि मनसे युतीवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.


बैठक कुठे आणि कशी घडली? (Devendra Fadnavis )

  • राज ठाकरे सकाळी 9:40 वाजता हॉटेलमध्ये पोहोचले
  • देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) 10:35 ला दाखल
  • 11:35 ला दोघे हॉटेलमधून बाहेर
  • कोणताही अधिकृत शासकीय कार्यक्रम नसताना ही गुप्त भेट

फडणवीसांची ‘राजकीय टाइमिंग’ का ठरत आहे निर्णायक?

राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे की, ही भेट म्हणजे मनसेला भाजपच्या जवळ आणण्याची रणनीती होती का? शिवसेना-मनसे युती होण्याच्या चर्चेला या भेटीने जोरदार ब्रेक लागण्याची शक्यता आहे.


उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार होते का?

गेल्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंच्या मनोमिलनाची चर्चा सुरू होती. विशेषतः मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी ही युती भाजपसाठी डोकेदुखी ठरली असती. मात्र, आजच्या फडणवीस-राज ठाकरे भेटीमुळे हे समीकरण बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.


आगामी निवडणुकीवर परिणाम?

जर राज ठाकरे आणि भाजपमध्ये गुप्त समन्वय झाला असेल, तर आगामी निवडणुकांमध्ये शिवसेना (UBT) ला मोठा धक्का बसू शकतो. विशेषतः मुंबई, ठाणे आणि पुणे महानगरपालिका निवडणुकांमध्ये नवे समीकरण तयार होण्याची शक्यता आहे.


अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य नाही!

ना राज ठाकरे, ना फडणवीस यांनी भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधला. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक होती की त्यामागे मोठा राजकीय डाव आहे, हे स्पष्ट झालेलं नाही.


राजकीय विश्लेषक काय म्हणतात?

“फडणवीस (Devendra Fadnavis ) हे महाराष्ट्रातील सर्वात रणनीतिक राजकारणी आहेत. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची त्यांची ओळख आहे. ही भेट ठरवूनच झाली असावी,” — राजकीय विश्लेषक


महाराष्ट्राचं राजकारण तापलंय!

शिवसेना – मनसे युतीपासून भाजपने मनसेला दूर ठेवलं, तर आगामी निवडणुकांमध्ये मोठा भूकंप होऊ शकतो. आता सर्वांची नजर आहे राज ठाकरे पुढे काय भूमिका घेतात याकडे!

https://youtu.be/TbIOFShzOyE