Chhagan Bhujbal News – Nashik Traffic Jam | Dwarka Chowk News | Chhagan Bhujbal Latest Update | Nashik Development News
नाशिकचे प्रवेशद्वार – द्वारका चौक लवकरच होणार वाहतूक कोंडीमुक्त, हाजी अली पॅटर्नची अंमलबजावणी
नाशिक: शहराच्या मुख्य प्रवेशबिंदूवर असलेल्या द्वारका चौकात (Dwarka Chowk) वारंवार होणारी वाहतूक कोंडी (Traffic Jam) दूर करण्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी स्वतः मैदानात उतरत यंत्रणांना चांगलाच इशारा दिला आहे.
पाहणी दौऱ्यात अधिकाऱ्यांना फटकारले
आज सकाळी ११ वाजता छगन भुजबळ यांनी द्वारका चौकाची पाहणी केली. या दौऱ्यात महानगरपालिका अधिकारी (NMC), पोलीस प्रशासन आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे (NHAI) अधिकारी उपस्थित होते.
“जबाबदारी ढकलून चालणार नाही. मी मंत्री म्हणून नव्हे, तर नाशिककर म्हणून आलो आहे. शहर सुधारण्यासाठी प्रत्येकाने जबाबदारी घ्यावी,” असा स्पष्ट संदेश भुजबळ यांनी दिला.
हाजी अली पॅटर्ननुसार वाहतूक नियोजन
छगन भुजबळ म्हणाले की, “मागील अनेक महिन्यांपासून द्वारका चौकातील बेट हटवण्याची मागणी केली होती. आता त्यासाठी प्रत्यक्ष अंमलबजावणी होणार आहे.“
- मोठ्या वाहनांना उड्डाणपुलावर थांबवून थेट तिथेच दंडात्मक कारवाई करावी
- रस्त्यांवरील बेशिस्त हातगाड्या, अतिक्रमण दूर करण्यात यावे
- पोलिसांना अडथळा निर्माण करणाऱ्यांवर त्वरित कारवाईचे आदेश
भुजबळांनी अधिकाऱ्यांना सुनावले – “काम नसेल करत तर मी उतरेन रस्त्यावर!”
पाहणीवेळी उड्डाण पुलाखाली अतिक्रमण, भिक्षेकरी ठाणं यावर प्रश्न विचारल्यावर मनपा अधिकाऱ्यांनी ‘हे आमचं काम नाही’ असे उत्तर दिले.
त्यावर भुजबळ भडकले आणि म्हणाले:
“मी मुंबई महापालिका सांभाळली आहे. कोणाचं काय काम हे मला ठाऊक आहे. जर अधिकारी काम करत नसतील, तर मी स्वतः रस्त्यावर उतरेन.”
अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी मनसे आणि भाजप आमदारांचा पाठिंबा
दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी याच चौकातील अतिक्रमण हटवण्यासंदर्भात बैठक घेतली होती. त्याला भुजबळांनीही दुजोरा दिला.
यावेळी त्यांनी स्पष्ट निर्देश दिले की, “हातगाड्या, पार्किंग अराजकता, आणि रस्त्यातील अडथळे हटवा.“