Chhagan Bhujbal News Nashik : गावपातळीवरील अधिकारी-कर्मचाऱ्यांची भूमिका लोकाभिमुख प्रशासनासाठी अत्यंत महत्वाची – मंत्री छगन भुजबळ

Chhagan Bhujbal News Nashik: The role of village level officers and employees is very important for people-oriented administration – Minister Chhagan Bhujbal

Nashik News (Chhagan Bhujbal News Nashik) | ग्रामपातळीवरचे तलाठी, मंडलाधिकारी आणि ग्रामपंचायत कर्मचारी हे नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवणारे खरे लोकसेवक आहेत. ग्रामस्थांच्या अडचणी प्राधान्याने सोडवून प्रशासन अधिक गतिमान करण्यासाठी गावपातळीवरील अधिकारी आणि कर्मचारी यांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ते कुसूर व धामोडे येथील तलाठी कार्यालयांचे तसेच नगरसूल (ता. येवला) येथील तलाठी व मंडलाधिकारी कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. यावेळी उपविभागीय अधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन, मंडलाधिकारी गणेश गाडेकर, गट विकास अधिकारी नम्रता जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी सुमेरसिंग पाकळ आदी मान्यवर उपस्थित होते.

गावपातळीवरील प्रशासन अधिक सक्षम करण्याचा संकल्प

मंत्री भुजबळ म्हणाले की –

  • मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आणि आरोग्यसेवकांनी नागरिकांच्या अडी-अडचणी तात्काळ सोडवाव्यात.
  • सुसज्ज तलाठी कार्यालयांमुळे दस्तऐवज सुरक्षित राहतील आणि कामकाज जलदगतीने होईल.
  • प्रशासनाची गती आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठी स्थानिक पातळीवर समन्वय आवश्यक आहे.

महत्वाचे प्रकल्प व पाणीपुरवठा योजना

  • सौर कृषी पंप योजनेमुळे दिवसा वीजपुरवठा सुलभ झाला आहे.
  • मांजरपाडा पथदर्शी प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आला असून, येवला तालुक्याच्या शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी २६३ कोटी रुपये खर्चून कालव्याचे काँक्रीटीकरण पूर्ण.
  • या प्रकल्पाच्या जादा पाण्यासाठी पार गोदावरी प्रकल्प राबवला जाणार असून डीपीआर तयार. वर्षभरात काम सुरू होईल.
  • प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर १० टीएमसी पाणी नाशिकसह मराठवाड्याला उपलब्ध होणार.
  • मतदारसंघातील पाणीप्रश्न प्राधान्याने मार्गी लावले जातील.

बांधकाम खर्चाचा तपशील (Chhagan Bhujbal News Nashik)

  • कुसूर व धामोडे तलाठी कार्यालय – प्रत्येकी ₹३३ लाख
  • नगरसूल मंडलाधिकारी कार्यालय – ₹३७ लाख

कार्यक्रमातील उपस्थिती

या सोहळ्यात सरपंच सुरेखा गायकवाड, कांताबाई भड, अनिता पैठणकर, उपसरपंच मंगल कमोदकर, लता गायकवाड यांच्यासह ग्रामस्थ व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.