‘छावा’ सिनेमाने शिवप्रेमींच्या मनावर गारुड केले!
Chhava Movie : गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात ‘छावा’ सिनेमाची जबरदस्त चर्चा सुरू आहे. चित्रपटाच्या टीझर, ट्रेलर आणि गाण्यांनी आधीच प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण केली होती, आणि आता रिलीज झाल्यानंतर सिनेमा हाउसफुल्ल गर्दी खेचत आहे. प्रत्येक शिवप्रेमीच्या काळजाला भिडणाऱ्या या सिनेमाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळतोय.
Chhava Movie: थिएटरमध्ये घोषणांनी गाजला ‘छावा’!
सिनेमाच्या एका शोदरम्यान घडलेला प्रसंग सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. एक पेज व्हिडीओ शेअर करताना सांगते की, सिनेमाचा शेवट होताच संपूर्ण थिएटरमध्ये उपस्थित प्रेक्षक आपल्या जागेवर उभे राहिले. यानंतर एका व्यक्तीने “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय!” अशी घोषणा दिली आणि संपूर्ण थिएटर “हर हर महादेव” आणि “जय भवानी जय शिवाजी”च्या गर्जनांनी दणाणून गेले.
हा अंगावर शहारे आणणारा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला असून, अनेक शिवप्रेमी या सिनेमाने भावूक झाले आहेत.
विकीने मानले प्रेक्षकांचे आभार!
सिनेमाला मिळणाऱ्या जबरदस्त प्रतिसादानंतर अभिनेता विकीने प्रेक्षकांसाठी खास पोस्ट शेअर केली. त्याने लिहिले –
“तुमच्या प्रेमाने ‘छावा’ला खऱ्या अर्थाने जीवंत केलंय! तुमचे मॅसेज, फोन्स, आणि तुम्ही शेअर करत असलेले व्हिडीओ मी पाहतोय. संभाजी महाराजांची शौर्यगाथा साजरी करणाऱ्या तुम्हा प्रत्येकाचे मी खूप आभार मानतो!”
पोस्टच्या शेवटी विकीने “विश्वास आपका साथ हो, तो युद्ध लगे त्योहार!” हा ‘छावा’ सिनेमातील दमदार डायलॉग शेअर केला.
‘छावा’ सिनेमा – शिवप्रेमींसाठी एक पर्वणी!
‘छावा’ सिनेमा केवळ एक ऐतिहासिक चित्रपट नसून, तो एक भावना बनला आहे. संभाजी महाराजांच्या अपराजित शौर्याची गाथा उलगडणारा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनाला भिडत आहे.