Chhawa movie : विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला ‘छावा’ (Viky Kaushal Chhawa) चित्रपट वादाच्या भोवऱ्यात! (Chhawa movie political reactions)

विकी कौशलची प्रमुख भूमिका असलेला 'छावा' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात !

Chhawa movie : छावा’ या चित्रपटाच्या ट्रेलरने मोठा गाजावाजा केला, परंतु काही दृश्यांवर आणि संवादांवर अनेकांनी आक्षेप घेतले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांसारख्या ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाचे चुकीच्या प्रकारे चित्रण होत असल्याचा आरोप अनेक संघटनांनी केला. विशेषतः छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसूबाई नृत्य करताना दाखवलेल्या दृश्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. या विरोधात काही संघटनांनी आंदोलनही केले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Chhawa movie वादग्रस्त दृश्य हटवले

राजकीय आणि सांस्कृतिक आक्षेपांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी निर्माते आणि दिग्दर्शकांशी चर्चा केली होती. सामंत यांनी सांगितले की, चित्रपटातील वादग्रस्त नृत्य दृश्य आता काढून टाकण्यात आले आहे. त्यांनी असेही नमूद केले की, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जगभर पोहोचावा, हा चित्रपट बनवण्यामागील उद्देश चांगला आहे, पण ऐतिहासिक पात्रांचे योग्य चित्रण होणे गरजेचे आहे.

Chhawa movie संभाजीराजे भोसले यांची भूमिका

माजी खासदार संभाजीराजे भोसले यांनी देखील आपला संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “दिग्दर्शकांनी मला ट्रेलर दाखवला होता, पण मी त्यांना पूर्ण चित्रपट दाखवण्याची विनंती केली होती. तसेच, काही इतिहासकारांना चित्रपटात सहभागी करून घेण्याचा सल्ला दिला होता, मात्र त्यात विशेष स्वारस्य दाखवले गेले नाही.” त्यांनी दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले असले, तरी ऐतिहासिक तथ्यांबाबत उदासीनता पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

Chhawa movie : चित्रपटावरील अपेक्षा आणि जबाबदारी

Chhawa movie : ‘छावा’ हा चित्रपट केवळ मनोरंजनापुरता मर्यादित नाही, तर तो छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनातील प्रेरणादायी आणि महत्त्वाच्या पैलूंना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आहे. परंतु, चित्रपटाच्या माध्यमातून चुकीची माहिती पसरवली जाऊ नये, ही जनतेची आणि इतिहासप्रेमींची अपेक्षा आहे.

चित्रपट प्रदर्शनापूर्वी तज्ज्ञांकडून पुनरावलोकन होणे, हा एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे मंत्री सामंत यांनी स्पष्ट केले आहे. आता ‘छावा’ चित्रपटातील हे बदल प्रेक्षक कशाप्रकारे स्वीकारतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.