मुंबई, दि. 1 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (बीएमसी) नायर रुग्णालयात झालेल्या लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात कठोर कारवाई करण्याचे आदेश देत, त्यांनी पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिले आहेत. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त सुरक्षा उपाययोजना राबवण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, “आरोग्य क्षेत्रात अशा प्रकारच्या घटना गंभीर असतात. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक कारवाई करू. सर्वांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे.”