नाशिकः नाशिकरोड येथील सद्गुरू नगरात केजे मेहता शाळेजवळ चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे. सायंकाळी ७.४० वाजता शोभा पंडित या महिलेला भाजी घेऊन घरी जात असताना दोन दुचाकीस्वारांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र खेचले.
शोभा पंडित यांनी तात्काळ आरडाओरडा करताच दुचाकीस्वारांनी घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली. सीसीटीव्हीमध्ये दोन संशयित दुचाकीस्वार हे स्पष्टपणे दिसत असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
पोलीसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे तसेच या संदर्भात काही माहिती मिळाल्यास तात्काळ स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.