नाशिक: माजी नगरसेवक सतनाम सिंग तिवाना यांचे गुरुवार, 19 डिसेंबर 2024 रोजी रात्री दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाने नाशिक शहरात शोककळा पसरली आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मुख्यमंत्री CM देवेंद्र फडणवीस यांनी काल त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन तिवाना यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले व त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. तिवाना यांच्या योगदानाचे स्मरण करताना मुख्यमंत्री CM फडणवीस म्हणाले, “सतनाम सिंग तिवाना हे समाजसेवेसाठी नेहमीच तत्पर होते. त्यांच्या योगदानाची नेहमी आठवण राहील.”
सतनाम सिंग तिवाना यांनी आपल्या कार्यकाळात नाशिकच्या विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. त्यांच्या निधनाने नाशिक शहराने एक सामाजिक कार्यकर्ता गमावला आहे.
तिवाना यांच्या अंतिम दर्शनासाठी शहरातील विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी हजेरी लावली. त्यांच्या कुटुंबीयांवर दुख:चा डोंगर कोसळला असून अनेकांनी त्यांना सांत्वन केले.
He Pan Wacha : Manmohan Singh : माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन