CNG Pump Queue Issue | Nashik Special Report | सीएनजीचा तुटवडा – वाहनधारकांचे तासन्तास प्रतीक्षा दुःखदायक
नाशिक CNG Queue Problem Nashik: जिल्ह्यात सीएनजी वाहनांची संख्या वाढत असताना, सीएनजी पंपांवरील तुटवडा आणि पुरवठ्याचा असमतोल ही गंभीर समस्या बनली आहे. जिल्ह्यात सुमारे ४० सीएनजी पंप असले तरी, केवळ ४ पंप २४ तास सुरू आहेत. परिणामी वाहनचालकांना २ ते ३ तास रांगेत उभे राहणे अनिवार्य ठरले आहे.
पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाढली सीएनजीची मागणी
२०११ नंतर सीएनजी वाहने भारतीय बाजारात रुजू झाली आणि इंधन बचतीमुळे अनेकांनी सीएनजी वाहनांकडे वळण सुरु केलं. मात्र, आज वाहनचालकांची बचतीची ही संकल्पना तासन्तासाच्या प्रतीक्षेमुळे त्रासदायक बनली आहे.
सीएनजी पंपांची संख्या पुरेशी पण पुरवठा अपुरा
- नाशिक जिल्ह्यात ४० सीएनजी पंप, त्यापैकी १५ पंप शहरात
- एमएनजीएलचे ५ पंप (४ शहरात, १ मालेगावात)
- खासगी पंपांना फक्त ७०० किलो सीएनजीचा पुरवठा, गरज आहे २००० किलोची
- ३३,५९८ सीएनजी वाहने, त्यात ७,६०० पूर्णतः सीएनजीवर
- नाशिकमध्ये सीएनजी दर ९२.६५ रुपये प्रति किलो, गुजरातपेक्षा १० रुपये जास्त
खासगी पंपांवर तुटवड्याची गंभीरता
एमएनजीएलचे पंप २४ तास सुरू असताना, खासगी पंपांना पुरवठा अपुरा दिला जात आहे. त्यामुळे वाहनधारकांची रोजची प्रतीक्षा आणि त्रास वाढला आहे.
गुजरातहून येणाऱ्या टँकरमधील अनियमिततेमुळे, महिन्यातून ८-१० दिवस पुरवठा विस्कळीत होतो. याचा थेट परिणाम पंप चालकांच्या उत्पन्नावर, कर्मचारी पगार आणि पंप मेंटेनन्सवर होत आहे.
प्रत्यक्ष अनुभव – वाहनधारकांची व्यथा (CNG Queue Problem Nashik)
- “सीएनजी पंपांवर रांगेत उभं राहून व्यवसायावर परिणाम होतो. वेळ, पैसा आणि मानसिक त्रास होत आहे.”
- “पूर्वी सीएनजीसाठी रात्रीच गाडी पंपावर लावावी लागत होती, आता तीच वेळ पुन्हा आली आहे.”
- “वशिलेबाजीमुळे पंपांवर वाद-विवाद आणि गैरसोयीचं वातावरण निर्माण होतं आहे.”
मुंबईहून पाइपलाइनचा पर्याय, पण वाट बघा लागणार वर्षभर
एमएनजीएलच्या समृद्धी महामार्गाद्वारे पाइपलाइनचे काम सुरू आहे, जे घोटीपर्यंत पोहोचणार असून त्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात पुरवठा सोपा होईल. पण, या पाइपलाइनसाठी किमान एक वर्ष लागणार असल्याने, तोपर्यंत टँकरद्वारेच तुटपुंजा पुरवठा सुरू राहणार आहे.
नाशिक सीएनजी दर – इतरांपेक्षा जास्त
- नाशिकमध्ये दर ९२.६५ रुपये प्रति किलो
- गुजरात आणि पुण्याच्या तुलनेत दरात १० रुपयांनी फरक
- दर कमी असूनही, वेळेचा अपव्यय बचतीवर पाणी फिरवतो