आज नवरात्री उत्सवाचा चौथा दिवस
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नवरात्री, दुर्गेचे चौथे स्वरूप
कुष्मांडा
अस्र-शस्र : कमंडलू, धनुष्य, बाण, कमळाचे फूल, अमृत कलश, चक्र आणि गदा
वाहन : सिंह
चौथी माळ -रंग केशरी|| चतुर्थीचे दिवशी विश्वव्यापक जननी हो |
|| उपासका पाहसी अंबे प्रसन्न अंतकरणी हो || || पूर्णकृपे तारिसी जगन्माते मनमोहिनी हो | || भक्तांच्या माऊली सुर ते येती लोटांगणी हो || || आपल्या स्मित हास्यामुळे ब्रह्मांड उत्पन्न केल्यामुळे या || देवीला “कुष्मांडा” देवी असे म्हणतात.
कुष्माण्ड म्हणजे || कोहळा देवीला तो विशेष आवडतो. कोहळ्याचा बळी || तिला अधिक प्रिय आहे. म्हणून चण्डीयागाच्या वेळी. || होमहवनात कोहळा अर्पण केला जातो. या विश्वातील || विविध तापत्रय, त्रास, असुरी शक्तींचा नायनाट करून || या विश्वाचे, संसाराचे रक्षण करणारी देवीशक्ती म्हणजेच
|| कुष्माण्डा.
|| नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. || या दिवशी अत्यंत पवित्र मनाने कुष्मांडा देवीला समोर || ठेवून पूजा केली पाहिजे. सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा || या देवीनेच आपल्या स्मित हास्याने ब्रह्मांडाची रचना. || केली होती. म्हणून ती सृष्टीची आद्यशक्ती आहे. || या देवीचे निवासस्थान सूर्यमंडळात आहे. तिथे निवास || करण्याची शक्ती केवळ या देवीमध्येच आहे. तिचे शरीर || सूर्याप्रमाणे दैदिप्यमान आहे. तिचे तेज आणि प्रकाशामुळे. || दही दिशा उजळून निघतात. ब्रह्मांडात असलेल्या सर्व || वस्तू आणि प्राण्यांमधील तेज केवळ या देवीच्या. || कृपेमुळेच आहे. देवीच्या आठ भुजा आहेत म्हणून ही || देवी अष्टभुजा या नावाने देखील प्रसिद्ध आहे. || आठव्या हातात जपमाळ असून तिचे वाहन सिंह आहे. || कुष्मांडाच्या उपासनेमुळे भक्तांचा आजार बरा होतो. || तिच्या भक्तीमुळे आयुष्य, यश, शक्ती आणि आरोग्यात || वाढ होते. त्याला सुख,समृद्धी आणि प्रगतीकडे घेऊन || जाणारी ही देवी आहे. || चवथ्या दिवशी कुष्मांडा देवीला मालपुव्याचा नैवेद्य || दाखवतात. तसेच मंदिरात ब्राह्मणाला दान दिल्याने. || बुद्धीचा विकास होऊन निर्णय घेण्याच्या क्षमतेत वाढ || होते असे मानतात.
–मंत्र– सुरासंपूर्णकलशं रुधिराप्लुतमेव च। दधानाहस्तपद्याभ्यां कुष्माण्डा शुभदास्तु मे. ।।आई कुष्मांडा च्या पूजेने यश, शक्ती,बुद्धी आणि आरोग्यात वृद्धी होते