Crypto investment scam in Nashik : नाशिकमध्ये क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली युवकाची ७५.९५ लाखांची फसवणूक

Crypto investment scam in Nashik

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल; फसवणूक ५ महिन्यांमध्ये

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Crypto investment scam in Nashik : क्रिप्टो करन्सीत गुंतवणुकीच्या नावाखाली एक धक्कादायक फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे. ३३ वर्षीय युवकाला ‘मोठ्या परताव्याचे’ आमिष दाखवून तब्बल ७५ लाख ९५ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला.

याप्रकरणी नाशिकच्या सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तरुणासोबत संपर्क करणाऱ्या व्यक्तींसह ज्या बँक खात्यांमध्ये हे पैसे जमा झाले, त्या खातेधारकांविरोधातही तपास सुरू आहे.

२२ ऑक्टोबर २०२४ ते २० मार्च २०२५ दरम्यान फसवणूक (Crypto investment scam in Nashik)

पीडित युवकाने सांगितले की, २२ ऑक्टोबर २०२४ ते २० मार्च २०२५ या कालावधीत ही फसवणूक करण्यात आली. सुरुवातीला फेसबुकवरून ओळख झाली, त्यानंतर त्याला एका व्हॉट्सअ‍ॅप गुंतवणूक ग्रुपमध्ये सामील करून, ‘हाय रिटर्न’ देणाऱ्या क्रिप्टो स्कीम्स दाखवण्यात आल्या.

यावर विश्वास ठेवून तरुणाने वेळोवेळी लाखो रुपये गुंतवले. परंतु, ना परतावा मिळाला ना मूळ रक्कम परत झाली. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तरुणाने सायबर पोलिसांकडे धाव घेतली.

सायबर पोलिसांकडून सखोल तपास (Crypto investment scam in Nashik)

फसवणुकीचा प्रकार लक्षात घेत सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू केला आहे. ज्या खात्यांमध्ये रक्कम ट्रान्सफर करण्यात आली, त्या सर्व खात्यांची माहिती गोळा केली जात आहे.

सावधगिरीचे आवाहन

सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियावरून होणाऱ्या ‘लाभदायक’ गुंतवणूक योजनांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे. कोणतीही योजना सत्य असल्याची खातरजमा न करता पैसे गुंतवू नयेत, असेही त्यांनी सांगितले आहे.